Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitin Gadkari : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरीचं अडकले वाहतूक कोंडीत; चक्क दौरा करावा लागला रद्द

देशभरात रस्त्यांचं जाळ निर्माण करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. मात्र आज पुण्यात ते स्वत: वाहतूक कोंडीत अडकले होते. इतकंच नाही तर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्यांना त्यांचा पाहणी दौरा रद्द करावा लागला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 23, 2025 | 08:35 PM
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरीचं अडकेल वाहतूक कोंडीत; चक्क दौरा करावा लागला रद्द

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरीचं अडकेल वाहतूक कोंडीत; चक्क दौरा करावा लागला रद्द

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात रस्त्यांचं जाळ निर्माण करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. मात्र आज पुण्यात ते स्वत: वाहतूक कोंडीत अडकले होते. इतकंच नाही तर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्यांना त्यांचा पाहणी दौरा रद्द करावा लागला आहे. चक्क वाहतूकमंत्र्यांनाच असा ट्रॅफीकचा सामना करावा लागल्याने याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.

Nashik Kumbh Mela : नाशिककरांसाठी मोठी बातमी! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांसाठी ३७०० कोटींचं बजेट

नेमकं काय घडलं?

पुण्यातील शनिवार वाडा ते स्वारगेट पर्यंत भुयारी मार्गाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित भुयारी मार्गासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार नितीन गडकरी शनिवार वाडा येथे पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. पण या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या. यात नितीन गडकरींची कारही अडकून पडली.

गडकरी यांची गाडी पुढे जात नव्हती. शेवटी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पण वाहतूक कोंडी फोडता आली नाही. नाईलाजास्तव नितीन गडकरी यांना पाहणी दौरा रद्द करावा लागला. गडकरींनी कामधूनच अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

पीएमपीच्या बसमधूनच सीसीटीव्ही गायब; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, तिकिट दर तर वाढवले, सुविधांचे काय?

पुण्यातील वाहतूककोंडीची समस्या दररोजचा विषय बनली आहे. पुणेकरांना याचा दररोज सामना करावा लागतो. त्याचा फटका आज खुद्द नितीन गडकरींना बसला आहे. दरम्यान या वाहतूक कोंडीला पोलीस आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचं स्थानिक आमदार रासने यांनी म्हटलं आहे. पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचे निवेदन देऊन लवकरच यासंदर्भात बैठक घेऊ, असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं आहे.

Web Title: Road transport and highways minister nitin gadkari stuck in punes traffic jam during shaniwar wada to swargate subway visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Nitin Gadkari
  • Pune Traffic
  • Union Minister Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Pune Traffic: आज संध्याकाळपासून ‘हा’ मार्ग राहणार बंद; कारण काय? वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार
1

Pune Traffic: आज संध्याकाळपासून ‘हा’ मार्ग राहणार बंद; कारण काय? वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार

Nagpur News: नागपूरची सिलिंडरमुक्तीकडे वाटचाल; नितीन गडकरींकडून HCGच्या CGS कम मदर स्टेशनचे उद्घाटन
2

Nagpur News: नागपूरची सिलिंडरमुक्तीकडे वाटचाल; नितीन गडकरींकडून HCGच्या CGS कम मदर स्टेशनचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.