Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार पुढील काळात विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट केली जाऊ शकते, असेही कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात अथवा नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2026 | 12:47 PM
खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे रविवारी (दि.२) सकाळी १० वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग १३९८१ क्युसेकने वाढवून एकूण २०७७९ क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार पुढील काळात विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट केली जाऊ शकते, असेही कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात अथवा नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्रात जनावरे, वाहने किंवा अन्य साहित्य असल्यास ते तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

Maharashtra Rain Update : पुढील 24 तास महत्त्वाचे ! ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

खडकवासल्यातून 43 हजार क्यूसेकने विसर्ग

महाराष्ट्रात सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटमाथा, सातारा, महाबळेश्वर आणि पुणे विदर्भात सगळीकडे मुसळधार कोसळत आहे. पुणे शहराला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पुण्यात अति ते अति जोरदार पाऊस झाला. अनेक भागात पाणी साचले आहे. वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदीपत्रात उतरू नये, खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपत्रात 45 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी संमतीची पुन्हा मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम संधी

Web Title: Significant increase in discharge from khadakwasla dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.