Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?

Pune Water News: पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीची बैठक २९ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पुणे शहरासाठी १३.२ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला. मात्र, हा कोटा नेमका कोणत्या कालावधीसाठी आहे, याबाबत संभ्रम आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2026 | 08:52 PM
5 टीएमसीची कपात केल्याने टंचाई होऊ निर्माण होऊ शकते 

5 टीएमसीची कपात केल्याने टंचाई होऊ निर्माण होऊ शकते 

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहराला स्वतंत्रपणे १३ टीएमसी पाणी देण्याची मागणी 
  • 5 टीएमसीची कपात केल्याने टंचाई होऊ निर्माण होऊ शकते 
  • २९ ऑक्टोबर रोजी झालेली कालवा समितीची बैठक 
Pune Water News: खडकवासला धरणसाखळीतून पावसाळ्यात कालवा आणि नदीद्वारे सोडण्यात आलेले पाणी पुणे महापालिकेच्या वार्षिक पाणी कोट्यात धरू नये. तसेच १ नोव्हेंबर २०२६ ते ३० जून २०२७ या आठ महिन्यांच्या कालावधीसाठी पुणे शहराला स्वतंत्रपणे १३ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पुण्याच्या पाणी कोट्यात सुमारे पाच टीएमसीची कपात करण्यात आल्याने आगामी उन्हाळ्यात शहरासमोर पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीची बैठक २९ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पुणे शहरासाठी १३.२ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला. मात्र, हा कोटा नेमका कोणत्या कालावधीसाठी आहे, याबाबत संभ्रम आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा कोटा १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. जलसंपदा विभागानेही या वृत्ताचे खंडन केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी वापराचाही या वार्षिक कोट्यात समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे भिमाले यांनी म्हटले आहे.

Pune Water: पुणेकरांना Diwali 2026 चे मोठे गिफ्ट; पाणी कपातीबाबत महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे शहरात नव्याने गावांचा समावेश झाल्याने शहराचे भौगोलिक क्षेत्र वाढले असून लोकसंख्या ७० लाखांच्या पुढे गेली आहे. या लोकसंख्येला दररोज सुमारे १७० एमएलडी पाण्याची गरज आहे. पाणीगळती रोखण्यासाठी महापालिकेची समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, समाविष्ट गावांमधील जुन्या पाणीपुरवठा योजना, वाढते नागरीकरण आणि शहराची भौगोलिक रचना यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

यंदा अल निनोमुळे पावसाचे प्रमाण विस्कळीत राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने महिनाभरापासून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. पाणी बचतीबाबत जनजागृतीही केली जात आहे. दुसरीकडे, पुढील दोन महिन्यांत जायका नदी सुधार प्रकल्पांतर्गत नऊ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून शेतीसाठी सुमारे ६.५ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे यंदा शंभर टक्के भरली होती. पावसाळ्यात या धरणांमधून कालवा आणि नदीद्वारे तब्बल १९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. विशेष म्हणजे पावसाळ्यात सुरू करण्यात आलेल्या कालव्यातून आजही शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणसाखळीतील पाणीसाठा २४ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. या परिस्थितीत पुणे शहराच्या पाणी कोट्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक असल्याचे भिमाले यांनी म्हटले आहे.

कालवा समितीच्या निर्णयानुसार १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी १३ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी ऑक्टोबरअखेरपर्यंत ६.३५ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत केवळ ७.१५ टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. सध्या १० टक्के पाणीकपात लागू असतानाही शहराची महिन्याची गरज १.५ टीएमसी आहे. त्यानुसार नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांसाठी किमान १२ टीएमसी पाणी आवश्यक आहे. मात्र, मंजूर कोट्यामुळे उपलब्ध होणारे पाणी या गरजेच्या तुलनेत अपुरे ठरणार आहे.

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळीनंतर पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या पाण्याची मागणी आणखी वाढू शकते. परिणामी, ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. हे संकट टाळण्यासाठी पावसाळ्यात सोडण्यात आलेले पाणी वार्षिक कोट्यातून वगळून नोव्हेंबर ते जून २०२७ या कालावधीसाठी स्वतंत्रपणे १३ टीएमसी पाणी मंजूर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला द्यावेत, अशी मागणी भिमाले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कालवा समितीच्या बैठकीत किती पाणी कपात करण्यात आली आहे?

    Ans: कालवा समितीच्या बैठकीत पुण्याच्या पाणी कोट्यात सुमारे पाच टीएमसीची कपात करण्यात आली आहे.

  • Que: श्रीनाथ भिमाले यांनी मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली?

    Ans: आठ महिन्यांच्या कालावधीसाठी पुणे शहराला स्वतंत्रपणे १३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Bjp leader demand to cm fadnavis supply 13 tmc water for pune city tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Khadakwasla Dam
  • pune news
  • Pune Water News

संबंधित बातम्या

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा
1

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन
2

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’
3

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान
4

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.