पुणे: स्पाईसजेटच्या पुण्याहून जयपूर ला जाणाऱ्या SG1080 या विमानाला पुणे विमानतळावर तब्बल ६ तासांचा उशीर झाला. गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजता नियोजित असलेले या विमानाने शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास पुण्याहून उड्डाण घेतले. विशेष म्हणजे, प्रवाशांना विलंबाची माहिती वेळेत न देता, विमानतळावर दाखल झाल्यानंतरच ती कळवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
प्रवाशांकडून कंपनीवर संताप
“आम्ही वेळेत विमानतळावर पोहोचलो, फक्त तेव्हाच विलंबाची माहिती मिळाली. पुन्हा पुन्हा वेळ बदलली जात होती. एकही जबाबदार अधिकारी भेटला नाही, ना समाधानकारक उत्तर मिळालं,” अशा शब्दात अर्चना जोशी या महिला प्रवाशाने संताप व्यक्त करीत आपली प्रतिक्रिया नोंदवली.
स्पाईसजेटकडून उत्तर अपेक्षित