Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड तालुक्यात परतीच्या पावसाचे दमदार कमबॅक; अनेक ठिकाणी जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला

सुमारे एक ते दीड तास झालेल्या या जोरदार पावसामुळे ओढे, नाले वाहते झाले असून शेतात पाणी साचले आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, बाजरी यासह फळबागांना मोठा फायदा होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 22, 2026 | 01:23 PM
दौंड तालुक्यात परतीच्या पावसाचे दमदार कमबॅक; अनेक ठिकाणी जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला

दौंड तालुक्यात परतीच्या पावसाचे दमदार कमबॅक; अनेक ठिकाणी जोरदार हजेरी, बळीराजा सुखावला

Follow Us
Follow Us:

पाटस : दौंड तालुक्यातील दौंड शहरासह पाटस, कुरकुंभ, मळद, नानगाव, कानगाव यासह तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परतीच्या पावसाच्या या आगमनाने मान टाकलेल्या शेत पिकांना जीवदान मिळाले असून, बळीराजा सुखावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दहा दिवसांचा गणेशोत्सव यंदा पावसाअभावी कोरडा जातोय की काय, असे चित्र निर्माण झाले होते. हवामान विभागाने दिलेला पावसाचा अंदाजही फेल जातोय का, असे वाटत होते. शेतातील पिके पाण्याअभावी माना टाकू लागली होती. मात्र, सोमवार (दि.२१) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, सुमारे एक ते दीड तास झालेल्या या जोरदार पावसामुळे ओढे, नाले वाहते झाले असून शेतात पाणी साचले आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, बाजरी यासह फळबागांना मोठा फायदा होणार आहे. परतीचा पाऊस वेळेवर आल्याने रब्बी हंगामासाठीही हा पाऊस पोषक ठरणार आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागात सर्वदूर पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले

गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाडा आणि घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना अखेर वरुणराजाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी दुपारनंतर शहरात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चिंचवड परिसरात तब्बल 50 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे शहर व परिसरात केवळ शिडकावा

एकीकडे पिंपरी-चिंचवड आणि मावळ पट्ट्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असताना, पुणे शहरात मात्र केवळ हलक्या सरींवरच समाधान मानावे लागले. पुण्यातील बहुतांश भागांत पाऊस हुलकावणी देताना दिसला.

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसाचा उन्हाचा फटका बसत आहे. मात्र, रविवारी आणि सोमवारी राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले. असे असताना आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात गरबा खेळण्यासाठी मुलींची ‘बोली’? 1000 ते 5000 रुपयांपर्यंत बोली लावली जात असल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा

Web Title: Strong comeback of retreating rains in daund taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Rain News

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
1

पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड
3

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
4

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.