Porsche Car Accident: रक्त बदलण्यास सांगणाऱ्या आरोपीला सुप्रीम कोर्टाचा दणका; दिला महत्वाचा निर्णय
पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर भागात एक अपघात घडला होता. पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच गाजले. दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्याचे रक्ताचे नमुने बदलण्याचा देखील प्रयत्न केला गेला होता. दरम्यान आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान सुप्रीम कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
आरोपीच्या सांगण्यावर एकाने स्वतःच्या रक्ताचे नमुने दिले होते. जामीन फेटाळला गेल्यामुळे आरोपीची अटक आता निश्चित झाली आहे. अरुणकुमार देवनाथ सिंग असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग याने येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळला होता. नंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अपील केले होते. सुरुवातीला त्याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र आता न्यायालयाने त्याचा जामीन (दि. २३ ऑक्टोबर) फेटाळला होता. त्यानंतर सिंग याने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सिंग याला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता रक्त बदलण्याच्या प्रक्रीयेत सक्रीय सहभाग दिसत असल्याने जामीन फेटाळून लावला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मागर्दशनात सहायक आयुक्त गणेश इंगळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. पहिले दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेले आहे. अद्याप याप्रकरणातील अल्पवयीन चालक मुलाच्या कुटूंबियांना जामीन मिळालेला नाही.
सिंगच्या सांगण्यावरून मित्तलने रक्त दिले
अल्पवयीन कारचालक मुलाच्या दोन अल्पवयीन मित्र देखील अपघातावेळी गाडीत होते. त्यांना वाचविण्यासाठी गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेले आरोपींनी ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली. त्यानंतर आरोपीने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला, तर आशिष नावाच्या आरोपीने अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसर्या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा: पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी महत्त्वाची अपडेट; रक्त बदलण्याचा सल्ला डॉ. अजय तावरेंचाच
पुण्यातील हायप्रोफाईल अपघातप्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्त बदलण्याचा सल्ला डॉ. अजय तावरे यानेच बिल्डर विशाल अगरवाल याला दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यासोबतच डॉ. तावरे याला आणखी संपर्क साधला होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणात लाच स्वीकारून अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी व खोटा रक्ताचा बनावट अहवाल तयार केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि या तिघांविरोधात प्रिव्हेन्शन करप्शन ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अजून या अपघात प्रकरणात अग्रवाल कुटुंबीयांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते हे ओहणे महत्वाचे असणार आहे.