Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: भीमाशंकरला जाणे सोपे होणार; ‘या’ रस्त्याचे काम प्रगतीपथावर, लवकरच…

सदर रस्त्याला सुमारे ३ कोटी ५० लाख रूपये खर्च होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन रस्त्याचे काम चांगल्या प्रकारचे करण्यासाठी ठकेदाराला सूचनाही दिल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 08, 2025 | 06:02 PM
Pune News: भीमाशंकरला जाणे सोपे होणार; 'या' रस्त्याचे काम प्रगतीपथावर, लवकरच...

Pune News: भीमाशंकरला जाणे सोपे होणार; 'या' रस्त्याचे काम प्रगतीपथावर, लवकरच...

Follow Us
Close
Follow Us:

श्री क्षेत्र भीमाशंकर  हे बाराज्योतीलिंगापैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र
श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर
गेल्या काही महिन्यापासून चालू आहे या रस्त्याचे काम

रांजणी/रमेश जाधव: बाराज्योितलिंगापैकी असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम (Road Development )प्रगतीपथावर असून सदर काम चांगल्या दर्जाचे करण्याच्या सूचना संबंधीत ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे तळेघर ते  निगडाळे हा रस्ता चांगल्या प्रतीचा होण्यास निश्चित मदत होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रृती नाईक यांनी सदर रस्ता चांगल्या प्रतीचा होण्यासाठी जातीने लक्ष घातलेे आहे.श्री क्षेत्र भीमाशंकर हे बाराज्योतीलिंगापैकी आहे. वर्षभर राज्याच्या नवे तर देशातील कोट्यावधी भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी येत असतात. गेल्या काही महिन्यापासून या रस्त्याचे काम चालू आहे. मात्र सदर काम चांगले होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. संबंधित ठेकेदाराने नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन. तळेघर ते निगडाळे या रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे करण्याचा मानस ठेवला आहे. त्यानुसार रस्त्याचे काम आता चांगल्या प्रतीचे होत आहे.

दरम्यान, भीमाशंकरला जाण्यासाठी सर्व वहातुक मंचर घोडेगाव, डिंभा तळेघर मार्गे श्री क्षेत्र भीमाशंकरकडे होते. येथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे या रस्त्याचे महत्व अधिक आहे. गेल्या सहा़़-सात महिन्यांपासून सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. उन्हाळ्यातील सुट्टीची गर्दी तसेच पावसाळ्यामुळे निसर्ग सौंदर्य वाढल्याने पर्यटकांची गर्दी कमी झाली असली तरी ती श्रावण महिन्यात वाढली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता या रस्त्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. रस्ता चांगला होण्यासाठी अधिकारी वर्ग जागरूक असल्याचे अधिक्षक अभियंता डी.बी. विभूते यांनी सांगितले.

PCMC महापालिका आयुक्तांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; पवना नदी सुधार प्रकल्प अन्…

सदर रस्त्याल सुमारे ३ कोटी ५० लाख रूपये खर्च होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन रस्त्याचे काम चांगल्या प्रकारचे करण्यासाठी ठकेदाराला सूचनाही दिल्या आहेत. राज्याचे माजी सहकार मंत्री िदलीप वळसे पाटील यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मंचर भीमाशंकर रस्त्यावरील तळेघर ते िनगडाळे या रस्त्याच्या दुरूस्ती करिता साडे तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. स्वत: वळसे पाटील यांनी या रस्त्याचे काम चांगले होण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यानुसार रस्त्याचे काम आता चांगल्या प्रकारे प्रगती पथावर आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रृती नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता प्रेरणा कोटकर यांच्या देखरेखी खाली निगडाळे ते तळेघर रस्त्याचे काम चालू आहे. सध्या या रस्त्यावर बीएमकरण चालू असून त्यावर आणखी एक लेयर घेतला जाईल. पहिल्या लेयरला जरी खड्डे पडले असले तरी दुसऱ्या लेयरमुळे ते व्यवस्थित होतील असे उपअभियंता कोटकर यांनी सांगितले.

 

Web Title: Taleghar nigdale road work on progress to bhimashankar pne district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • bhimashankar
  • Development Work
  • Road Work

संबंधित बातम्या

पुरंदरमधील रस्त्यांवर गतिरोधकांची गरज; सायकल स्पर्धेनंतर वाहनांचा वेग वाढला
1

पुरंदरमधील रस्त्यांवर गतिरोधकांची गरज; सायकल स्पर्धेनंतर वाहनांचा वेग वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.