निविदा प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता, नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी तात्काळ डागडुजीचे काम सुरू करावे, अशी ठाम मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.
अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. या प्रकाराची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यातूनच संबंधितांवर कारवाईची अभिनव संकल्पना पुढे आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली येथे येत असल्याचे कळताच संबंधित विभागाने आरमोरी मार्गावरील या खड्ड्यांची रात्रीतूनच किरकोळ दुरुस्ती केली.
दुरुस्तीची कामे करताना कामे गुणवत्तापूर्वक करण्याबाबत संबंधित कनिष्ठ अभियंत्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे व त्यांच्या उपस्थितीत ही कामे करून घ्यावी. दुरुस्तीच्या कामांची बिले पावसाळा पूर्ण होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये.