सदर रस्त्याला सुमारे ३ कोटी ५० लाख रूपये खर्च होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन रस्त्याचे काम चांगल्या प्रकारचे करण्यासाठी ठकेदाराला सूचनाही दिल्या आहेत.
मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने ३० दिवसांच्या श्रावण यात्रेदरम्यान सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि दर्शन सहजसाध्य करण्यासाठी आगळ्यावेगळ्या गर्दी व्यवस्थापन पायलट प्रकल्पाची सुरुवात केली आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलिस चौकी या परिसरात उभारण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.