Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Weather: पुणे तापलं! शहर आणि परिसरात वाढल्या उन्हाच्या झळा; पुढील दोन दिवसांत…

हवामान शास्त्रज्ञ डॉ सुदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2025 | 07:08 PM
Pune Weather: पुणे तापलं! शहर आणि परिसरात वाढल्या उन्हाच्या झळा; पुढील दोन दिवसांत…
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून तापमानाचा पारा ४२. १ अंश सेल्सिअसपर्यंत पाेचला आहे. पुढील  चार ते पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे. त्यामुळे नागरीकांनी घरातुन बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.  २२ एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढला आहे. दिवसा असलेल्या तीव्र उन्हाच्या झळांमुळे वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी शिवाजीनगर येथे ४०.१, कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा येथे ४०.१, पाषाण येथे ४०, हडपसर येथे ३९.९, चिंचवड येथे ३८.६, एनडीए येथे ३८.२ अंश सेल्सियस तापमान होते. तर शुक्रवारी शिवाजीनगर येथे ४०.५, पाषाण येथे ४०.४, लाेहगाव येथे ४२.९,चिंचवड येथे ३९.२, मगरपट्टा येथे ४० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नाेंद झाली.

हवामान शास्त्रज्ञ डॉ सुदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. शहर आणि परिसरात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. २२ एप्रिलनंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून हवामान ढगाळ होण्याची, तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.’

उत्तरेकडील राज्यांत वाढलेले तापमान, तिकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानवाढ होत आहे. वायव्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टा सक्रिय आहे. या प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होत आहे.

पुण्यात तापमानाचा पारा 41 अंश पार; येत्या दोन दिवसांत…

उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या संभाच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या रुग्णालयांनी आणि शासकीय रुग्णालयांच्या स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेचा विचार करता आरोग्य विभगाच्यावतीने अलर्ट जारी करण्यात आला असून, डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. वृद्ध आणि गर्भवतींना उष्णतेच्या विकारांचा मोठा धोका संभवतो, या पार्श्वभूमीवर कुटुंबातील अशा सदस्यांची विशेष काळजी घेण्याची सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.

उष्णतेच्या लाटेपासून सावधगिरी गरजेची

उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी सावधानता बाळगणे हाच सर्वात चांगला उपाय आहे. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी कडक उन्हापासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • डॉ. अभयचंद्र दादेराव, आरोग्य अधिकारी, पीसीएमसी.

Web Title: Temperature increast 40 to 42 celsius in pune city latest weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 07:05 PM

Topics:  

  • heat wave
  • Maharashtra Weather
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
1

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
2

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

पुणे, मुंबईसह सातारा, नाशिक, कोल्हापूर गारठले; तापमानात होतीये सातत्याने घट
3

पुणे, मुंबईसह सातारा, नाशिक, कोल्हापूर गारठले; तापमानात होतीये सातत्याने घट

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
4

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.