पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात (फोटो सौजन्य-X)
पुणे सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने पाच वाहनांना उडवलं. ही घटना आज (30 जुलै) ला सकाळी 9 च्या सुमारास घडली असून एक पिकप टेम्पो आणि एका ट्रकची एकमेकांना धडक दिली. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची तीन दुचाकी, एक पिकप टेम्पो आणि एका ट्रकला धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या धडकेनंतर कंटेनर आणि पिकप टेम्पो पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र 5 वाहनांची धडक एकमेकांना दिल्यामुळे 5 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
सकाळी ९ वाजताच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनरचे नियंत्रण सुटले आणि त्याने तीन दुचाकी, एक पिकअप टेम्पो आणि एका ट्रकला धडक दिली. या धडकेत कंटेनर आणि पिकअप टेम्पो उलटले.
अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पुण्यामध्ये अपघाताचे सत्र सुरुच पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात रविवारी एका 37 वर्षीय पुरूष आणि त्याच्या दोन अल्पवयीन मुलींचा ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
“आचार्य त्याची मुलगी सई (10) ला तिच्या शाळेतून घेऊन गेले. “ते, सई आणि त्याची दुसरी मुलगी मधुरा (4) मोटारसायकलवरून घरी परतत होते. याचवेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना मागून आलेल्या एका डंपर ट्रकने दुचाकीला धडक दिली,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
तर शनिवारी मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातात १ जण ठार तर जवळपास २५ जण जखमी झाले आहेत. खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने १५ ते १६ वाहनांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरचे खंडाळा घाटात तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटन घडली. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले व तो समोरील वाहनांना धडक देत तसाच पुढे जात राहिला. दिड ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यात या ट्रेलरने एकामागून एक वाहनांना धडक दिली. ज्यात लहान वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.