Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP News : राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा ‘मुहूर्त’ ठरला

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 12:55 PM
राजकीय हालचालींना वेग, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा 'मुहूर्त' ठरला

राजकीय हालचालींना वेग, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा 'मुहूर्त' ठरला

Follow Us
Close
Follow Us:
  • राजकीय हालचालींना वेग
  • जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा ‘मुहूर्त’ ठरला
  • ग्रामविकास विभागाचे आदेश
पुणे : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार २० मार्च २०२६ पूर्वी जिल्हा परिषद आणि संबंधित पंचायत समित्यांची पहिली बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका पूर्ण झाल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१’ मधील तरतुदीनुसार ही बैठक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

पुणे जिल्हाधिकारी यांना ही बैठक बोलावण्याचे अधिकार असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यासाठी विशेष बैठक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भातील आदेश अवर सचिव बा. म. आसोले यांनी जारी केला आहे. त्याची प्रत राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती व तातडीच्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, अध्यक्षपदासाठी विविध पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्याचे चित्र असून, आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

इच्छुकांची संख्या लक्षणीय

अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या लक्षणीय असल्याने पक्षांतर्गत बैठका, चर्चा आणि रणनीती आखल्या जात आहेत. एकंदरीत, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा आता निर्णायक टप्प्यात आली असून, सोमवारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे नवनिर्वाचित सदस्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला?

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी नियमानुसार त्यातील पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या अडीच वर्षांत ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला राबविण्याबाबत अंतर्गत स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The names of the office bearers of pune zilla parishad will be announced soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा
1

वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा

Baramati By Election: सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी रणनीती
2

Baramati By Election: सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी रणनीती

पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा
3

पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले
4

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.