Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा

पुणे शहरात बेशिस्तपणे वाहने दामटणार्‍यांविरूद्ध पोलिसांनी मोहिम उघडली आहे. त्यासोबतच आता वाहनांवरील थकित दंड ३० दिवसांत न भरल्यास वाहन परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 11:48 AM
वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर...; पुणे पोलिसांचा इशारा

वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर...; पुणे पोलिसांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा
  • रक्कम न भरल्यास वाहन परवाना रद्द करणार
  • पुणे पोलिसांचा वाहनधारकांना इशारा
पुणे : पुणे शहरात बेशिस्तपणे वाहने दामटणार्‍यांविरूद्ध पोलिसांनी मोहिम उघडली आहे. त्यासोबतच आता वाहनांवरील थकित दंड ३० दिवसांत न भरल्यास वाहन परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. थकित दंड असलेल्या वाहन चालकांचे परवाने थेट रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) पाठवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळीच वाहनावरील थकित दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.

 

पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक धोरण स्विकारले आहे. त्यात आता वाहतूक नियमभंगाचे उल्लंघन केल्यानंतर दंड असलेल्या तसेच त्यांनी तो न भरलेल्या वाहन मालकांकडे देखील लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यांना आता अधिकृत नोटीस पाठविली जात आहे. त्यानुसार संबंधितांनी ३० दिवसांच्या आत दंड भरणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. दंड न भरल्यास वाहन चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. तसेच प्रकरण न्यायालयात दाखल करण्याचीही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहन धारकांनी थकित दंडाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ दंड भरावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, २६ ते २८ फेबु्रवारी आणि १ मार्च कालावधीत पोलिसांकडून नोटीस पाठवली जाणार आहे.

नागरिकांनो असा जमा करा दंड

तुमच्या वाहनावरील थकित दंडाची रक्कम जमा करण्यासाठी पीटीपी अ‍ॅपचा वापर करावा. तसेच, चौक-चौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या अमलदाराकडे दंड जमा करण्यासंदर्भात विचारणा करावी. त्या ठिकाणीही दंड भरून घेतला जाणार आहे. तसेच आपल्या जवळच्या वाहतूक विभागातही दंड जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, वाहनधारकांनी अधिकृत वेबसाइटसह अमलदारांकडे दंडाची रक्कम भरावी. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरता येणार आहे.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांनो सावध व्हा! रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल मोठी किंमत

सायबर फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

  • वाहतूक पोलिसांकडून कोणतीही APK फाइल पाठविण्यात येणार नाही.
  • वाहनचालकांनी ओटीपी कोणालाही शेअर करू नये.
  • केवळ नोटीसमध्ये नमूद केलेल्या अधिकृत पेमेंट पद्धतींचाच वापर करावा.
  • संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेश आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.
हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?

Web Title: Pune police to take action if vehicle fine is not paid within 30 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Police Action
  • Pune Traffic Police

संबंधित बातम्या

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ
1

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप
2

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप

Pune Porsche Crash Case : जेलमधून बाहेर येताच विशाल अग्रवालचा एकच जल्लोष; नोटांचे हार गळ्यात घालून डान्स अन्…
3

Pune Porsche Crash Case : जेलमधून बाहेर येताच विशाल अग्रवालचा एकच जल्लोष; नोटांचे हार गळ्यात घालून डान्स अन्…

Baner Land Scam: कोट्यवधींची जागा फुकटात जाणार! बाणेरमधील महापालिकेचे ‘सार्वजनिक आरक्षण’ हातातून गेल्याचा गंभीर आरोप
4

Baner Land Scam: कोट्यवधींची जागा फुकटात जाणार! बाणेरमधील महापालिकेचे ‘सार्वजनिक आरक्षण’ हातातून गेल्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.