Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएमआरडीएमध्ये अंतर्गत बदल्यांसाठी जोरदार फिल्डिंग! दबावतंत्राचा वाढता प्रभाव; आयुक्तांच्या भुमिकेकडे लक्ष

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये अंतर्गत बदल्यांसाठी जोरदार ‘फिल्डिंग’ सुरू असल्याची चर्चा आहे. सोयीच्या विभागात बदली मिळवण्यासाठी काही अधिकारी दबावतंत्र, ‘सेटिंग’ आणि प्रभावाचा वापर करत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 05, 2026 | 12:50 PM
पीएमआरडीएमध्ये अंतर्गत बदल्यांसाठी जोरदार फिल्डिंग! दबावतंत्राचा वाढता प्रभाव; आयुक्तांच्या भुमिकेकडे लक्ष
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये अंतर्गत बदल्यांसाठी जोरदार ‘फिल्डिंग’ सुरू असल्याची चर्चा आहे. सोयीच्या विभागात बदली मिळवण्यासाठी काही अधिकारी दबावतंत्र, ‘सेटिंग’ आणि प्रभावाचा वापर करत आहेत. यामुळे पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याने नियमांना बगल देत थेट जमीन व मालमत्ता विभागात बदली मिळविल्याची माहिती पुढे आली आहे. या बदल्यामागे प्रशासकीय प्रक्रिया न पाळता ‘जुगाड’ लावल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित होत आहे.

 

पीसीएनटीडीएचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन केले होते. संबंधित कर्मचाऱ्याने सुरुवातीला कनिष्ठ अभियंता म्हणून अभियांत्रिकी विभागात काम पाहिले. त्यानंतर काही काळ अतिदक्षता निर्माण विभागात बदली झाली; मात्र तेथूनही बाहेर पडत त्यांनी पुन्हा ‘मलईदार’ विभाग गाठल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, १४ मार्च २०२४ रोजी शासनाने ६.२५ टक्के जमीन परतावा संदर्भात अध्यादेश काढला. त्यानंतर जमीन व मालमत्ता विभागाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले. या पार्श्वभूमीवरच संबंधित अधिकाऱ्याने या विभागात बदली मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. अखेर १५ जानेवारी २०२५ रोजी अंतर्गत बदल्याचा आदेश निघाला आणि ७ जुलै २०२५ रोजी बदली अधिकृतपणे अमलात आली.

परतावा प्रक्रियेवर संशयाची छाया

दरम्यान, ६.२५ टक्के जमीन परतावा प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचे आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. संबंधित फाईल्स तयार करण्याची जबाबदारी याच कनिष्ठ अभियंत्याकडे आहे. त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आहे का, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

कारवाईचा प्रश्न अनुत्तरित

विभागप्रमुखांकडून विरोध असतानाही अशा बदल्यांना मंजुरी कशी मिळते. याबाबत प्रशासनातच कुजबूज सुरू आहे. महानगर आयुक्त या प्रकरणात ठोस भूमिका घेतात का? आणि संबंधितांवर कारवाई होते का ?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दबावतंत्राचा वाढता प्रभाव

अंतर्गत बदल्यांसाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. काही अधिकारी सोयीच्या विभागात बदलीसाठी ‘फिल्डिंग’ लावत असल्याचे उघड होत आहे., यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असल्याचेही बोलले जात आहे.

मुळशी विभागात तक्रारींचा पाढा

मुळशी विभागातील कारभाराबाबत सर्वाधिक तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांना कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. एक अधिकारी गेल्या सात वर्षांपासून त्याच ठिकाणी कार्यरत असल्याची बाब विशेष चर्चेत आहे. संबंधित अधिकारी बदलण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Web Title: There are talks about internal transfers of officials in pmrda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • PMRDA

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.