Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : वडगाव नगरपंचायतीत 73% मतदानाची नोंद; EVM स्ट्रॉंगरूमला 24 तास कडेकोट पोलीस पहारा

मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झाले आहे. मात्र निकाल लांबणीवर पडल्याने स्ट्रॉग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 03, 2025 | 04:50 PM
Tight police security in EVM machine strength room after local body voting in Vadgaon Maval

Tight police security in EVM machine strength room after local body voting in Vadgaon Maval

Follow Us
Follow Us:
  • वडगाव नगर पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार
  • ईव्हीएम मशीन स्ट्रॉग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत
  • स्ट्रॉग रुमला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Maharashtra Politics : वडगाव मावळ : सतीश गाडे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्य नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काल (दि.02) मतदान देखील पार पडले. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर निकाल लांबणीवर पडला. येत्या 21 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत ईव्हीएम मशीनबाबत (EVM Machine) दक्षता पाळली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली. सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसत होत्या. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला. अखेर संपूर्ण दिवसभर झालेल्या मतदानानंतर 73 टक्के मतदान नोंदवण्यात आले.

मतदानानंतर ईव्हीएम सुरक्षित स्ट्रॉंगरूममध्ये

मतदान संपल्यानंतर सर्व २४ ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट युनिट्स सुरक्षितपणे सीलबंद करून नगरपंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्ट्रॉंगरूममध्ये हलवण्यात आली. मशीन हलवण्याची संपूर्ण प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ रेकॉर्डिंगसह करण्यात आली.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या घरी लगीनगाई! परदेशात पार पडणार विवाहसोहळा, राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण

स्ट्रॉगरूम प्रवेशासाठी कठोर बंदोबस्त तैनात 

पहिला सुरक्षा स्तर: नगरपंचायतीच्या परिघात कडक तपासणी, येणाऱ्यांची नोंद दुसरा सुरक्षा स्तर: स्ट्रॉंगरूमच्या अगदी बाहेर एसआरपीएफ व स्थानिक पोलीस तैनात या सुरक्षा व्यवस्थेत एसआरपीएफचे ७ जवान स्थानिक पोलिसांचे सुमारे १० कर्मचारी
अखंडित २४ तास ड्युटीवर आहेत.

सीसीटीव्ही चौकशी आणि लोखंडी गेट

स्ट्रॉंगरूमला लोखंडी गेट, मजबूत टाळे तसेच उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची जाळी बसवण्यात आली आहे. संपूर्ण परिसराचा व्हिडिओ रेकॉर्ड थेट नियंत्रण कक्षात पाहता येतो. कॅमेऱ्यांमध्ये स्ट्रॉंगरूमच्या आत, बाहेर, कॉरिडॉर आणि प्रवेशद्वारांचा प्रत्येक भाग स्पष्ट दिसतो. स्ट्रॉंगरूम परिसर हा पूर्णपणे नो-एंट्री झोन घोषित करण्यात आला असून उमेदवार, कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिकांना तेथे प्रवेश दिला जात नाही. आवश्यकतेनुसार केवळ निवडणूक आयोगाचे अधिकारीच परवानगीसह प्रवेश करू शकतात.

हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मतमोजणी 21 डिसेंबरला

नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यापर्यंत सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूममध्येच सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली राहणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी सुध्दा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यावेळी स्ट्रॉंगरूम उघडण्याची प्रक्रिया देखील प्रत्येक टप्प्यावर व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पार पडणार आहे.

Web Title: Tight police security in evm machine strength room after local body voting in vadgaon maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • maval news
  • Maval Politics

संबंधित बातम्या

६० वर्षांचा निष्ठावान सांगाती आणि विश्वासू सहकारी गमावला; माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने शरद पवार भावुक
1

६० वर्षांचा निष्ठावान सांगाती आणि विश्वासू सहकारी गमावला; माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने शरद पवार भावुक

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
2

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.