Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune: ऐन दिवाळीत पुण्याचा श्वास कोंडला! फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या हवेच्या प्रदूषणाचा AQI थेट…

Pune: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ‘समीर’ या मोबाईल ॲपवरील आकडेवारीनुसार, ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३० ते १५७ या दरम्यान होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 10, 2026 | 02:35 AM
Diwali 2026

Diwali 2026

Follow Us
Follow Us:
  • फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ
  • पुणे विद्यापीठ परिसरात सर्वात कमी एक्यूआयची नोंद
  • पुणे शहरात पाहायला मिळतोय दिवाळीचा मोठा उत्साह 
सुनयना सोनवणे /Pune: दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांत समाधानकारक असलेली पुण्याच्या हवेची गुणवत्ता लक्ष्मीपूजनाच्या रात्री मात्र खालावली. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरातील हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली. रात्री नऊच्या सुमारास शहराचा सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २६५ वर पोहोचला. शिवाजीनगर परिसरात सर्वाधिक ३१४, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सर्वांत कमी २१९ एक्यूआयची नोंद झाली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ‘समीर’ या मोबाईल ॲपवरील आकडेवारीनुसार, ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३० ते १५७ या दरम्यान होता. त्यामुळे हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत होती. मात्र, ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर प्रदूषणात वाढ होण्यास सुरुवात झाली. रात्री नऊ वाजता शहराचा एक्यूआय २६५ वर पोहोचला. व्यापारी पेठा, बाजारपेठा आणि वर्दळीच्या परिसरात झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने प्रदूषणाची पातळी उंचावते. फटाके फोडल्यानंतर निर्माण होणारा धूर, राख आणि सूक्ष्म कण हवेत मिसळतात. विशेषतः पीएम २.५ हे अतिसूक्ष्म कण श्वसनमार्गातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते.

Air Pollution Mumbai : फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट, बंदी असलेल्या बेरियमचा वापर; आवाज फाउंडेशनचा इशारा

यंदा दिवाळीच्या काळात पावसाने दडी मारल्याने हवेत साचलेले प्रदूषक कण वाहून जाण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यातच लक्ष्मीपूजनाच्या रात्री मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याने प्रदूषणात आणखी भर पडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांची आतषबाजी काहीशी कमी झाल्याचे चित्र असले, तरी हवेच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाला आहे.

परिसरनिहाय स्थिती – (एक्युआय)

धनकवडी : २८७
हडपसर : २६७
कात्रज डेअरी : २५१
म्हाडा कॉलनी : २९६
पंचवटी, पाषाण : २६७
शिवाजीनगर : ३१४
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : २१९

दिवाळीतील हवेची गुणवत्ता

तारीख -एक्यूआय
५ नोव्हेंबर – १३०
६ नोव्हेंबर – १३४
७ नोव्हेंबर – १५७
८ नोव्हेंबर – २६५

Mumbai News: वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप

हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची श्रेणी
० ते १०० : उत्तम
१०० ते २०० : समाधानकारक
२०० ते ३०० : वाईट
३०० ते ४०० : अत्यंत वाईट
४०० ते ५०० : गंभीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पुण्यातील एक्यूआय किती होता?

    Ans: या तीन दिवसांमध्ये पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३० ते १५७ या दरम्यान होता.

  • Que: सर्वात कमी एक्यूआयची नोंद कुठे झाली?

    Ans: सर्वात कमी एक्यूआयची नोंद पुणे विद्यापीठ परिसरात झाली.

Web Title: Increase aqi in pne city shiaji nagar during fire crackers diwali 2026 air pollution tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Air Pollution
  • AQI
  • Diwali 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Dharashiv News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंभार गल्लीत भीषण आग! गरीब कुटुंबाचा संसार खाक; तरुणांच्या धाडसामुळे शेकडो घरे बचावली
1

Dharashiv News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंभार गल्लीत भीषण आग! गरीब कुटुंबाचा संसार खाक; तरुणांच्या धाडसामुळे शेकडो घरे बचावली

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात
2

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी
3

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी

Delhi Diwali Firecrackers Sale : मग प्रदुषण तर होणारचं ना! दिल्लीकरांनी एका दिवसात फोडले 300 कोटींचे फटाके
4

Delhi Diwali Firecrackers Sale : मग प्रदुषण तर होणारचं ना! दिल्लीकरांनी एका दिवसात फोडले 300 कोटींचे फटाके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.