Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस प्रशासनासह निवडणूक अधिकाऱ्यांचा लागणार कस; निवडणूक काळातच असणार पुरंदर तालुक्यातील वीरची यात्रा

पुरंदर तालुक्यात सर्वात मोठी यात्रा सुरु होत असल्याने पोलीस प्रशासनासह निवडणूक अधिकाऱ्यांचा चांगलाच कस लागणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 19, 2026 | 01:02 PM
पोलिस प्रशासनासह निवडणूक अधिकाऱ्यांचा लागणार कस; निवडणूक काळातच असणार पुरंदर तालुक्यातील वीरची यात्रा

पोलिस प्रशासनासह निवडणूक अधिकाऱ्यांचा लागणार कस; निवडणूक काळातच असणार पुरंदर तालुक्यातील वीरची यात्रा

Follow Us
Close
Follow Us:
  • पोलिस प्रशासनासह निवडणूक अधिकाऱ्यांचा लागणार कस
  • निवडणूक काळातच असणार पुरंदर तालुक्यातील वीरची यात्रा
  • यात्रेसाठी दररोज लाखो लोखांची गर्दी
सासवड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, २२ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर होतील. पाच फेब्रुवारीला मतदान आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी असून त्यादृष्टीने निवडणूक अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत. दरम्यान पुरंदर तालुक्यात याच कालावधीत सर्वात मोठी यात्रा सुरु होत असल्याने पोलीस प्रशासनासह निवडणूक अधिकाऱ्यांचा चांगलाच कस लागणार आहे.

 

पुरंदर तालुक्यातील क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाचा लग्न सोहळा आणि त्याच दिवसापासून सलग १० दिवस यात्रा सुरु होते. दरम्यान श्री क्षेत्र कोडीत येथून श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीचे क्षेत्र वीरकडे १ फेब्रुवारी रोजी दुपारी प्रस्थान असून, त्याच रात्री देवाचा लग्नसोहळा पार पडणार आहे. तसेच ६ फेब्रुवारी पासून देवाची भाकणूक आणि गजे जेऊ घालण्यास सुरुवात होत आहे. यात्रेत कोडीत येथून जवळपास ९५ टक्के लोक यात्रा कालावधीत वीर येथे मुक्कामी असतात. तसेच पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील आणि राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक यात्रेला येत असतात.

वीरची यात्रा आणि निवडणूक प्रचाराची रणधुमाळी एकाच कालावधीत येत आहे. एवढेच नाही अगदी प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी यात्रेच्या कालावधीतच येत आहे. पाच तारखेला मतदान आहे आणि याच काळात वीरची यात्रा असल्याने यात्रेनिमित्त पुरंदर हजारो ग्रामस्थ वीर मध्ये राहतील. परिणामी प्रशासनाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मतदानाच्या दिवशी एवढे मतदार त्यांच्या गावात उपलब्ध होणार का ? हाही प्रश्न आताच उपस्थित होत आहे.

क्षेत्र वीर ठरणार उमेदवारांच्या प्रचाराचे केंद्र

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांच्या गट, गणात प्रचारानिमित्त व्यस्त राहणार आहेत. मात्र क्षेत्र वीर येथे दुपारी आणि संध्याकाळी छबिना चालत असतो आणि यामध्ये वेगवेगळ्या गावातील मानाच्या काठ्या, पालख्यासह ग्रामस्थही सहभागी होत असल्याने प्रचाराच्या वेळेत उमेदवारांना भेटणे अवघड आहे. त्यामुळे यात्रा सुरु असली तरी त्याच धामधुमीत मतदारांना शोधून मतदानाचे आवाहन करण्यासाठी उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना वीरमध्येच जावे लागणार आहे. परिणामी यात्रेच्या काळात वीर गाव आणि देवस्थानचा परिसर प्रचाराचे केंद्र बनणार आहे.

यात्रेसाठी दररोज लाखो लोखांची गर्दी

निवडणूक कालावधीत निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांचे काम मतदान केंद्राच्या आत चालते. मात्र पोलीस प्रशासनाला मतदान केंद्राबरोबरच सर्वत्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. क्षेत्र वीर येथील देवाच्या यात्रेसाठी दररोज लाखो लोखांची गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि यात्रा सुरळीत पार पाडणे, यात्रेत कोणताही अनुचित प्रकार होवू न देणे यासाठी सासवड पोलीस विशेष काळजी घेत असतात. यासाठी सासवड पोलीस स्टेशन मधील संपूर्ण स्टाफ दहा दिवस वीरमध्ये ठाण मांडून असतो.

देवाचा लग्नसोहळा, भाकणूक आणि मारामारी (रंगाचे शिंपण) यात्रेच्या शेवटच्या दिवशी पोलिसांना इतर ठिकाणावरून बंदोबस्त मागवा लागत असतो. मात्र यात्रा आणि निवडणुकीचा बंदोबस्त एकत्र येत असल्याने त्याचा दुहेरी तणाव राहणार आहे. एका बाजूला यात्रा सुरळीत पार पाडून निवडणूक बंदोबस्त पुरविणे. तसेच राजकीय उमेदवार प्रचारानिमित्त वीरमध्ये मोठ्या संख्येने दिसणार असल्याने आचार संहितेचे पालन करतानाही सासवड पोलिसांची चांगलीच दमछाक होणार आहे.

हे सुद्धा वाचा : सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत

यापूर्वीची निवडणूक मारामारीच्या दिवशी आली होती

यापूर्वी नऊ वर्षापूर्वी पंचायत समिती, जिल्हा परिषदसाठी जे मतदान झाले होते. नेमके त्याच दिवशी वीरच्या यात्रेची मारामारी होती. त्यामुळे वीर, कोडीतसह काही गावात दुपारपर्यंत जवळपास शुकशुकाट होता. मारामारी झाल्यानंतर ग्रामस्थांना मतदानाच्या वेळेत मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली होती. परिणामी सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. यंदाही यात्रेचा कालावधी असल्याने मतदारांचीही धावपळ होण्याची चिन्ह आहेत.

Web Title: Veerchi yatra in purandar taluka will be held during the election period

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Pune Police News
  • Yatra News
  • ZP Election

संबंधित बातम्या

Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज!
1

Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज!

Satara Election : महायुतीमधील घटक पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा…; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत
2

Satara Election : महायुतीमधील घटक पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा…; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.