Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Cut : पुण्यात अखेर पाणी कपात होणार; आठवड्यातून एक दिवस पाणी बंद, येत्या गुरुवारपासून…

पाणी कपातीच्या निर्णयाचा परिणाम घरगुती ग्राहकांसह सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांवरही होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवसानुसार पाण्याचा साठा आणि वापराचे नियोजन करावे लागणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 13, 2026 | 08:34 AM
आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आदेश
  • पुण्यात नियमावली तयार करावी लागणार
  • शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनासमोर आव्हान
पुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार महापालिकेने येत्या गुरुवारपासून (ता.15) आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नियमावली लागू केली आहे. जलसंपदा विभागाने शहराच्या पाणी पुरवठ्यात 40 टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात केल्यास पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे ठरवले आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर केला गेला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाची प्रत महापालिका प्रशासनाला नुकतीच प्राप्त झाली. या अध्यादेशानुसार सोमवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप आदी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतील पाण्याचा उपलब्ध साठा, पुण्याची पाण्याची गरज, पाणी बचत, गळती आदीसंदर्भात चर्चा झाली.

या बैठकीत जलसंपदा विभागाने पाठवलेल्या पत्रात महापालिकेने सुमारे चाळीस टक्के इतकी पाणी कपात करण्याची सूचना केली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात केल्यास नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे दररोजच्या पाणीपुरवठ्यात मोठी कपात करण्याऐवजी आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे.

नियमावली तयार करावी लागणार

पाणी कपात लागू केल्यानंतर महापालिकेला पाणी बचत, पाण्याचा वापर आदी संदर्भातील नियमावली तयार केली आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेने विविध निर्बंध लागू केले आहेत. खासगी व सार्वजनिक वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, स्विमिंग पूलमध्ये पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरू नका

बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याऐवजी एसटीपी, विहीर किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहने, अंगण आणि पदपथ धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे मनपाने स्पष्ट केले आहे. अनधिकृत नळजोड आढळल्यास ते खंडित करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. तसेच, गळती तातडीने दुरुस्त करून सोसायट्यांनी एसटीपीच्या पाण्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान

राज्य सरकारने धरणांतील उपलब्ध पाणीसाठा आणि वाढती मागणी लक्षात घेऊन पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने महापालिकेला ४० टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

पाणी कपातीच्या निर्णयाचा परिणाम घरगुती ग्राहकांसह सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांवरही होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवसानुसार पाण्याचा साठा आणि वापराचे नियोजन करावे लागणार आहे. गुरुवारपासून लागू होणाऱ्या या व्यवस्थेनुसार शहरातील कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार, याचे वेळापत्रक महत्त्वाचे ठरणार आहे.

Navi Mumbai News : वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Web Title: Water cuts finally set for pune water supply to be shut off one day a week nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 08:34 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.