Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Mohan Naidu: “विकसित भारताच्या निर्मितीसाठी…”; ‘भारतीय छात्र संसदे’त केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंचे आवाहन

Pune News: भारतातील युवा पिढीचा जगात दबदबा आहे. ही पिढी विकसित भारताचा कणा आहे. केंद्रीय मंत्री म्हणून भारतातील युवा पिढीबाबत मला आदर आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2025 | 06:53 PM
Ram Mohan Naidu: "विकसित भारताच्या निर्मितीसाठी..."; 'भारतीय छात्र संसदे'त केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंचे आवाहन

Ram Mohan Naidu: "विकसित भारताच्या निर्मितीसाठी..."; 'भारतीय छात्र संसदे'त केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे देशाला एक लाख युवा लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. राजकारणात उच्चशिक्षित आणि चारित्र्यवान उमेदवार आले नाही, तर पुन्हा वाईट प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी येतील. आपले संविधान सर्वोच्च असून, आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाने आपल्या सर्वांना समान हक्क आणि मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यामुळे पुढे येऊन विकसित भारताच्या निर्मितीसाठी जबाबदारी घ्या आणि लोकसेवा करण्यासाठी राजकारणात या, असे आवाहन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी भारतीय छात्र संसदेतील देशभरातील युवा प्रतिनिधींना केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट, पुणे यांच्या वतीने आयोजित १४ व्या भारतीय छात्र संसदेच्या तिसर्‍या सत्रात ‘भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर : भारतीय युवकांची कोंडी’ या विषयावर नायडू बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. यावेळी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, खासदार अरूण गोविल, ज्येष्ठ अभिनेत्री खुशबू सुंदर, माजी केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी, आचार्य शिवम, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.

राममोहन नायडू किंजरापू म्हणाले की, भारतातील युवा पिढीचा जगात दबदबा आहे. ही पिढी विकसित भारताचा कणा आहे. केंद्रीय मंत्री म्हणून भारतातील युवा पिढीबाबत मला आदर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांंच्या विचारांनी आणि शिकवणीने युवा पिढीचे कल्याण होणार आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर, माझ्या कुटुंबावर आणि तेलगू भाषिक जनतेवर प्रचंड दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळला होता.

मात्र, हार न मानता जबाबदारी घेण्याचे ठरविले आणि कामाला सुरुवात केली. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासोबतच, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यशही आले. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी मला तिसर्‍यांदा निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास टाकत, मला केंद्रीय मंत्री केले. त्यामुळे माझ्यावर मतदार संघातील आणि देशातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी असून, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तसेच, सुमित्रा महाजन यांनी एका आईप्रमाणे माझी काळजी घेतली. मला वेळोवेळी मार्गदर्शन केले.

खुशबू सुंदर म्हणाल्या की, भारताला विकसित बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही भारतीय हे दोन शब्दच आपली सभ्यता आणि संस्कृती जगासमोर आणतात. भारतातील युवा पिढी उद्याचे भविष्य आहे. अरुण गोविल म्हणाले , संस्कृती ही हृदयात असते. असे असतानाही आई- वडिलांकडून पाश्चात्य संस्कृती आपल्याला लहानपणीपासून दिली जाते. भारतीय संस्कृती आत्मसात केल्यावरच, आपला देश विश्वगुरू होणार.
कुलदीप सिंह पठानिया म्हणाले, युवा पिढीने पाश्चिमात्य संस्कृती किंवा भारतीय संस्कृती या दोन्ही संस्कृतीमधील चांगल्या गोष्टी घ्याव्यात. हे करीत असताना, भारतीय संस्कृतीला अजिबात विसरून चालणार नाही. डॉ.राहुल कराड यांनी भारतीय छात्र संसदेच्या आयोजनाचा उद्देश सांगत, देशात सक्षम लोकशाहीच्या निर्मितीसाठी युवा पिढीला शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले.
देशात उत्कृष्ट विमानसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा उभारणीचे काम वेगाने सुरू आहेत. येत्या काही दिवसात तुम्हाला विमानसेवा क्षेत्रात अमूलाग्र बदल झालेले दिसतील.
– राममोहन नायडू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री

Web Title: Youth come politics for develop india union minister of civil aviation ram mohan naidu appeal to students pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 06:53 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
3

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
4

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.