Baramati, Mahavitaran, Power Cut, Load Shedding
याबाबत भापकर यांच्यासह शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन दिले आहे. वीजपुरवठ्यातील वारंवार होणाऱ्या खंडितपणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनियमित भारनियमनामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, शेतकरी, व्यापारी आणि लघुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणा, विद्युत पंप, घरगुती उपकरणे, दुकाने व विविध व्यवसायांवर वीजखंडित होण्याचा थेट परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत असून, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत.
बारामती तालुक्यातील अनियमित भारनियमन तातडीने थांबवावे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत व नियमित करावा तसेच नियोजित भारनियमन असल्यास त्याची पूर्वसूचना नागरिकांना द्यावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.वीजपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक असून, वारंवार होणाऱ्या खंडितपणामुळे निर्माण झालेली गैरसोय दूर करण्यासाठी महावितरणने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
Sangamner Farmers Protest News: संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयात राडा! आक्रमक शेतकऱ्यांकडून
सदर निवेदन देताना हनुमंत भापकर यांच्यासह वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख दत्ता लोणकर, माज जिल्हाप्रमुख सुनील शिंदे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख ॲड अनिल शेडगे, संभाजी शिंदे, भगवान गोफणे, जयराम सणस, प्रताप बामणे आदी उपस्थित होते.






