Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport News: पुरंदर विमानतळाचा ‘टेक-ऑफ’ सुसाट! ६३७ कोटींच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी

Purandar Airport- जिल्हा बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात बँकेच्या आर्थिक सक्षमतेचा आढावा सादर केला आहे. पीडीसीसी बैंक ही देशातील अग्रगण्य जिल्हा बँक असून तिच्या एकूण २९४ शाखांचे जाळे पसरलेले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 11, 2026 | 02:00 PM
पुरंदर विमानतळ, पीएमआरडीए, पुणे न्यूज, रस्ते प्रकल्प, Purandar Airport, PMRDA, Pune Infrastructure,

पुरंदर विमानतळ, पीएमआरडीए, पुणे न्यूज, रस्ते प्रकल्प, Purandar Airport, PMRDA, Pune Infrastructure,

Follow Us
Follow Us:
  • विमानतळाला जोडण्यासाठी ६१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नियोजन
  • पीएमआरडीएने या प्रकल्पासाठी ६३६ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी
  • सध्या भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून १२ फेब्रुवारी २०२५ रोजीच याला प्रशासकीय मान्यता
 

Purandar Airport News: प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीपूर्वीच या परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने ‘पंख’ फुटले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) विमानतळ जोडणीसाठी तब्बल ६३६ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, ६१ किलोमीटर लांबीच्या भव्य रस्ते प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या प्रकल्पामुळे केवळ अंतरच कमी होणार नाही, तर पुरंदर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट होणार आहे.

विमानतळ झाल्यास तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा अडधळा येऊ नये, या दूरदृष्टीने पीएमआरडीएने हे नियोजन केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सध्या भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, यासाठी स्वतंत्र तरतूद नसली तरी प्राधिकरणाने आपल्या अंतर्गत निधीतून या कामाचा मार्ग मोकळा केला आहे. या रस्तेजाळ्यामुळे पुरंदर आणि लगतच्या परिसरातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे.

Purandar Airport Land Acquisition: ४५० एकर जमिनीचा संमती करार पूर्ण

पुणे जिल्ह्याच्या महत्त्वाकांक्षी पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच न देता, तो ‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या’ (पीडीसीसी) खात्यातही जमा करण्याची परवानगी द्यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे. पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या – प्रमाणावर जिल्हा बँकेशी जोडलेले आहेत. जिल्हा बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात बँकेच्या आर्थिक सक्षमतेचा आढावा सादर केला आहे. पीडीसीसी बैंक ही देशातील अग्रगण्य जिल्हा बँक असून तिच्या एकूण २९४ शाखांचे जाळे पसरलेले आहे.

पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन, प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड; अनेक तर्कवितर्कांना उधाण

असे असेल नव्या रस्त्यांचे जाळे

विमानतळाला जोडणारे एकूण चार मुख्य मार्ग विकसित केले जाणार आहेतः

पुणे-बोपदेव-सासवड मार्गः पुणे शहरातून थेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी १९.५ कि.मी.चा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

उरुळी कांचन-वाघापूर मार्गः सोलापूर महामार्गावरून येणारी वाहतूक या १५ कि.मी.च्या मार्गामुळे सुलभ होईल.

खेड शिवापूर-गराडे-सासवडः सातारा महामार्गावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी १६ कि.मी.चा हा मार्ग ‘लाईफलाईन’ ठरणार आहे.

सासवड-पानगाव-चौफुलाः जिल्हांतर्गत दळणवळणासाठी १०.५ कि.मी.चा रस्ता विकसित केला जाईल.

 

 

Web Title: Purandar airport news road project worth 637 crore approved for purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • PMRDA
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
1

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेपर्यंत बाधित सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळणार
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेपर्यंत बाधित सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळणार

Purandar Airport : हक्कसोड पत्र दिलेल्या बहिणींच्या नव्याने आलेल्या हरकती फेटाळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं
3

Purandar Airport : हक्कसोड पत्र दिलेल्या बहिणींच्या नव्याने आलेल्या हरकती फेटाळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं

पुरंदर विमानतळ बाधितांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा; मोबदला वितरणासाठीच्या विलंबाचं कारणही सांगितलं
4

पुरंदर विमानतळ बाधितांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा; मोबदला वितरणासाठीच्या विलंबाचं कारणही सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.