मुंबई (Mumbai)तील वांद्रे पूर्व भागात रस्त्यावर अजगर (Python) दिसून आला आहे. रात्रीच्या वेळी अजगर रस्ता ओलांडत असल्याने वाहनांना कळ काढावी लागली. हा भाग खारफुटी(Mangrove)चा आहे.
Python found near CM Uddhav Thackeray Bungalow Matoshree, Bandra East @saamTVnews @SakalMediaNews pic.twitter.com/TPCJM4AHHb
— Omkar Wable (@MrWabs) June 14, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्याशेजारील (Matoshree Bungalow) कलानगरजवळ झालेल्या उड्डाणपुलाखाली रात्री अजगर दिसला. स्थानिकांनी तत्काळ सर्पमित्र (Snake Friend) अतुल कांबळे यांना फोन केला. मात्र, अजगर पुढे रस्ता ओलांडून एका गटाराच्या पाईपमध्ये गेला. त्याला अतुल कांबळे आणि सूरज मोरे यांनी बाहेर काढून वनविभागाच्या हवाली करण्यात आला आहे.