Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: “… अन्यथा शेतमाल विक्री बंद करू”; रघुनाथदादांचा ‘या’ मागणीवरून शासनाला १५ एप्रिलपर्यंत अल्टिमेटम

ग्राहकासाठी आम्ही हे धोरण राबवत आहोत असे सांगणाऱ्या सरकारचे पितळ उघडे पडले आहे. कारण शहरी ग्राहकांना हा सर्व माल अव्वाच्या सव्वा किंमतीत घ्यायला लागत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2025 | 09:51 PM
Sangli News: “… अन्यथा शेतमाल विक्री बंद करू”; रघुनाथदादांचा ‘या’ मागणीवरून शासनाला १५ एप्रिलपर्यंत अल्टिमेटम
Follow Us
Close
Follow Us:
सांगली: संपूर्ण कर्जमाफी करा, कारखान्यांची अंतर अट रद्द करा ,सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा, शेतकऱ्यांनाची वीज बिले माफ करा यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अर्थात १४ एप्रिल पर्यंत मान्य कराव्यात अन्यथा राज्यात आम्ही शेतमाल विक्री बंद करू, आशा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.  येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे पायी चालत जाऊन शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन शासनाला १५ एप्रिल पर्यंत अल्टिमेटम दिला आहे.
यावेळी बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, ”  दि. १९ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२५ छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते साहेबराव करपे कुटुंबियांच्या स्मृतीदिनापर्यंत एक महिना जनजागरण करून शेतकरी कर्जमुक्ती, शेतीमालावरील निर्यात बंदी, दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करणे अशा मागण्यासाठी १९ मार्च  रोजी मा. कृषी आयुक्त, पुणे यांचे कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चा वेळी आम्ही सरकारला सूचना दिली होती की, १४ एप्रिल २०२५ रोजी महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही १५ एप्रिल  पासून आमच्या शेतीमालाचे विक्री बंद करणार आहोत.
साखर, दूध, भाजीपाला, फळे, फुले इत्यादी माल तसेच अन्नधान्य शहराकडे जाणार नाही. अशी व्यवस्था करू वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रान्सपोर्टरना ही तशी सूचना करत आहोत. शेतीमालाला भाव नसल्यामुळे एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी आत्महत्या करत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी केलेल्या घटनादुरुस्त्या केलेले शेतकरी विरोधी कायदे व या कायद्याविरोधात कोणत्याही कोर्टात दाद मागता येणार नाही अशी केलेली घटना दुरुस्ती. यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय नाही. देशभरात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत व करत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे. शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला खचितच हे भूषण नाही.

Sangli News: “… अन्यथा संस्था पेटवू”; शेतकऱ्यांच्या ‘या’ मुद्यावरून रघुनाथदादा पाटील यांचा सरकारला इशारा

ग्राहकासाठी आम्ही हे धोरण राबवत आहोत असे सांगणाऱ्या सरकारचे पितळ उघडे पडले आहे. कारण शहरी ग्राहकांना हा सर्व माल अव्वाच्या सव्वा किंमतीत घ्यायला लागत आहे. महागाईला तोंड देता देता सर्वजण बेजार झाले आहेत. हे धोरण फक्त उद्योगपतींना स्वस्त कच्चामाल मिळावा त्यांना मजूर स्वस्त मिळावेत म्हणून आतापर्यंत सर्व सरकारे राबवत आली आहेत.
पेट्रोल, डिझेल, रासायनिक खते यांचे वाढलेले दर आणि सरकार शेतकऱ्यांकडून वसूल करत असलेले जीएसटी सारखे छुपेकर यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. असा सरकारचाच अहवाल आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांचा कलंक समुळ नष्ट करण्यासाठी सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आमच्या दि. १५ एप्रिल  पासून सुरू होणाऱ्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. असेही पाटील म्हणाले.

Web Title: Raghunathdada patil criticizes to maharashtra government about farmers issue sangli marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 09:51 PM

Topics:  

  • Farmers Issues
  • Raghunath Patil
  • sangli news

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही
2

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा
3

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा

Maharashtra Politics : सांगलीत आज राष्ट्रवादीचा मोर्चा! शरद पवार यांच्या पक्षाचे दिग्गज नेते सांगलीत एकवटणार
4

Maharashtra Politics : सांगलीत आज राष्ट्रवादीचा मोर्चा! शरद पवार यांच्या पक्षाचे दिग्गज नेते सांगलीत एकवटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.