राहुल गांधी यांचा भाजप, RSS वर संविधानावरून गंभीर आरोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या विचारातून संविधान निर्माण झालं आहे. भारत हा विविधतेने भरलेला देश असून अनेक जातीपातीचे लोकं एकत्र नांदतात हीच भारताची खरी ओळखं आहे. मात्र भारताच्या या एकात्मतेला एकत्र ठेवणाऱ्या संविधानाला काही अदृश्य शक्तींपासून धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आज नागपुरात संविधा सन्मा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा-Parali Constituency: शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? धनंजय मुंडेंचा पवारांना थेट सवाल
संविधानवर आरएसएस थेट हल्ला करु शकत नाहीत, म्हणून लपून वेगळ्या मार्गाने हल्ला केला जात आहे. राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेवरही भाष्य केले. राहुल गांधी यांनी अदानी-अंबानी यांच्यावरुन पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधा. जातनिहाय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आणि हक्क असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सर्वसाधारण जातीतील लोकं सांगतात की जात आम्हाला तर कधी दिसली नाही. पण तुम्ही ती पाहिली तर दिसेल. दलित मागास समाजाला मात्र तर ती रोज दिसते. त्यांनी यातून रोज जावं लागतं. त्यामुळे जातजनगणा महत्त्वाची आहे. जातजनगणना झाली तर खऱ्या अर्थाने प्रत्येक समाजाला न्याय मिळेल. जातीनुसार जनगणना केली तर देशाचं सर्व चित्र स्पष्ट होईल. प्रत्येकाला समजेल कोणाच्या हाती किती पैसा आहे. मला खात्री आहे की जेव्हा हे होईल त्यात दलित, आदिवासी, मागास असे कुणीही देशाच्या पुंजीमध्ये आपल्याला दिसणार नाहीत. जातनिहाय जनगणना हा विकास करण्याचा एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतीक पातळीवरचे एक अर्थतज्ज्ञ आहेत त्याच्याशी चर्चा केली, भारतात मोठी असमानता पहायला मिळते, असं त्यांनी म्हटलं. त्यावर मी त्याला म्हटलं की तुम्ही मला जे सांगितलं त्यात जात हा शब्द वापरलेला नाही. ज्यातून असमानता मुद्दा सुरु होतो.
हेही वाचा-Mahim Constituency: माहीम मतदारसंघात मोठा ट्विस्ट; भाजप अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही
संविधान सन्मान संमेलनात याधीही चांगली चर्चा झाली आहे. त्यातून नवी दिशा मिळत असते. या संमेलनांमधून महात्मा गांधी ,शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, तुकाराम महाराज, शाहू महाराज, बिरसा मुंडा, भगवान बुद्ध यांचं, त्यांच्या विचारांच स्मरण करतो. त्यांच्या विचारांवर चर्चा करतो. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गाधी यांचा विषय येतो, त्यावेळी तो एका व्यक्तीचा विषय नसतो. कोट्यवधी लोकांचा तो आवाज असतो. आंबेडकरांच्या पुस्तकांमधून बरच काही शिकायला मिळते, ते नेहमी सर्वसामान्यांविषयी बोलायचे.
देशाचं संविधान केवळ एक पुस्तक नाही, तर जगण्याचा मंत्र असून आंबेडकरांच्या संविधानात फुले-बुद्धांचा आवाज आहे. समानता, प्रत्येक जाती-धर्माचा आदर आहे. शिक्षण, आरोग्य व्यवस्था, जगण्याचा अधिकार आणि हजारो वर्षांपासूनचा विचार आहे. आरएसएस समोरासमोर लढत नाही कारण, समोरासमोर त्यांचा कधीच निभाव लागणार नाही. जर लढले तर ते पाच मिनिटात पराभूत होतील. त्यामुळे कायम लपून हल्ला करण्याचं काम सुरु आहे.
निवडणूक आयोग, प्रशासन, सरकारी संस्था असं सगळेच संविधानात आहे. एक व्यक्ती देशाचं भविष्य हिसकावेल, असं संविधानात लिहिलेलं नाही. असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. शिशुमंदिरासाठी एमपी, गुजरात, राजस्थानमधून पैसे आले. अदानी, अंबानी यांचा पैसा, विकासाचा पैसा त्यासाठी आला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.