Photo Credit- Team Navrashtra माहीम मतदारसंघात भाजप अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माहीम विधानसभा मतदारसंघावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालपर्यंत भाजपने माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते.पण आता अचानक मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी युटर्न घेत अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात भाजपकडून फक्त एका जागेवर मनसेला पाठिंबा दिला जाणार आहे. आणि ती म्हणजे शिवडी विधानसभा मतदारसंघ, शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर निवडणूक लढवत आहेत. असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
सुरूवातीला भाजपने माहीम विधानसभा मतदारसंघात पाठिंबा देण्याची चर्चा केली होती. माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण आता भाजपने भूमिका बदलत मुंबईतील शिवडी मतदारसंघातच मनसेला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा: तुमच्याकडे LMV परवाना आहे का? ड्रायव्हिंग लायसन्सबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला महत्त्वाचा
आशिष शेलार म्हणाले, ‘कार्यकर्ता आणि प्रसारमाध्यमांमार्फत मी सर्व सांगत आहे. भाजपचा पाठिंबा फक्त शिवडी विधानसभा जागेपुरता मर्यादित आहे. नुकतेच मी माहीमबद्दल बोललो होतो, तुम्ही ते संपूर्ण महाराष्ट्रात पसरवले. आता मी फक्त शिवडी बद्दल बोलत आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, असे समजू नका.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर माहीम मतदारसंघावरू शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. पण सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच सुरूवातील भाजप खासदार नारायण राणे यांनीदेखील सदा सरवणकरांनाच पाठिंबा जाहीर केला. पण आशिष शेलार यांनी अचानक घुमजाव केले आणि माहीममधून भाजपचा पाठिंबा काढून घेतली. महायुतीचे उमेदवार आता सदा सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील हे सांगत त्यांनी माहीमचा विषयच संपवून टाकला.
हेही वाचा: काँग्रेसचा पुण्यातील बंडखोर उमेदवारांना इशारा, तिघांना बजावली नाेटीस
दरम्यान, भाजप नेत्यांनीही सदा सरवणकर यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपची मते कुणाला मिळाली, हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे. खंर तरे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. विशेषम म्हणजे, अनेक भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यातील वैयक्ति महायुतीकडून विधानसभा निवडणुकीत मनसेला भाजपकडून गुप्तपणे मदत पुरवली जाणार जाणार का, हेदेखील पाहावे लागेल. आशिष शेलार यांनी सदा सरवणकर यांना पाठिंबा देण्याची बाषा केल्यामुळे वांद्रे पश्चिम मतदारसंघासाठी मनसेची मते कुणाला मिळणार हेही पाहावे लागणा आहेे.