Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News :’ सीलिंग कायद्या’च्या अंमलबजावणीवरून मोठा गदारोळ; जंजिरा नवाबांच्या 4500 एकर जमिनीवर प्रश्नचिन्ह

अलिबाग येथे पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिका-यांनी सीलिंग इन होल्डिंग्ज कायदा, 1961 हा कायदा लागू करावा अशी मागणी  केली आहे.न्याय सबका अधिकार या सामाजिक संस्थेमार्फत भूमिहीन लोकांना जमिन मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 16, 2025 | 05:34 PM
Raigad News :’ सीलिंग कायद्या’च्या अंमलबजावणीवरून मोठा गदारोळ; जंजिरा नवाबांच्या 4500 एकर जमिनीवर प्रश्नचिन्ह
Follow Us
Close
Follow Us:
  • सीलिंग कायद्या’च्या अंमलबजावणीवरून मोठा गदारोळ
  • जंजिरा नवाबांच्या 4500 एकर जमिनीवर प्रश्नचिन्ह
  • सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांची जिल्हाधिकाऱ्यांवर थेट टीका
सर्वोच्च न्यायालयाच्या वकिल सोनिया राज सूद यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषद घेत रायगडच्या जिल्हाधिका-यांनी महाराष्ट्र कृषी जमीन (सीलिंग इन होल्डिंग्ज कायदा, 1961) लागू करण्यात केलेल्या कथित अक्षमतेबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. अलिबाग येथे घेतलेल्ल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिका-यांनी सीलिंग इन होल्डिंग्ज कायदा, 1961 हा कायदा लागू करावा अशी मागणी  केली आहे. अलिबाग येथील अ‍ॅड.  मंगेश गजानन घोणे यांच्या न्याय सबका अधिकार या सामाजिक संस्थेमार्फत भूमिहीन लोकांना जमिन मिळण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये सहकार्य करण्यासाठी अ‍ॅड. सुद यांनी आजची पत्रकार परिषद घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रमुख आरोप आणि मागण्या

कमाल कृषी जमीन  मर्यादेचे उल्लंघनः जिल्हाधिकारी रायगड हे माजी राजांच्या/नवाबांच्या जमिनींवर महाराष्ट्र कृषी जमीन (सीलिंग ऑन होल्डिंग्ज) रिमूव्हल ऑफ डिफेक्टीसीज ऑर्डर, 1970 लागू करण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोप अ‍ॅड.   सूद यांनी केला आहे. मुरूड जंजि-याचे दिवंगत नवाब सिदी मोहम्मद खान यांच्या वारसांना जिल्हाधिका-यांनी सुमारे 4 हजार 500 एकर जमीन धारण करण्याची परवानगी दिली आहे, जी बहुतांशी शेती जमीन आहे. प्रत्यक्षात, कृषी जमीन धारण करण्याची कमाल मर्यादा केवळ 54 एकर इतकी आहे अस म्हणणे अ‍ॅड.   सूद यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडले.
बेकायदेशीर नोंद :
दि. 1/4/1972  रोजी निधन पावलेल्या नवाबांच्या नोंदीवर अनिवार्य मृत्युपत्र नसतानाही, मुरुड तहसीलदार कार्यालयाने त्यांच्या 5 मुलांच्या नावे हजारो एकर जमिनीची नोंद बेकायदेशीरपणे केली असा आरोप अ‍ॅड. सूद यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. दहशतवादी संबंधांचे आरोपः 1993 ते 1999 या कालावधीत दहशतवादी इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा इक्बाल मेमन यांना काशिद बीचवरील १०० एकर जमिनीची विक्री झाली होती. तसेच, सध्या शस्त्र तस्करी आणि दारूगोळयासाठी मुरुडने श्रीवर्धनची जागा घेतली आहे, असा गंभीर आरोपही अ‍ॅड.   सूद यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. 2018 मध्ये पॅलेसजवळील शेत जमिन आणखी एका शस्त्र तस्कर व इक्बाल मिर्चीच्या जवळच्या नातेवाईकाला विकण्यात आली असा आरोपही अ‍ॅड.   सूद यांनी केला आहे.
परदेशातील बँक खाते लपवणारे नातेवाईकः नवाबाचे नातेवाईक अर्शद आदमजी जसदनवाला हे घाईघाईने 1000 एकर वनजमीन विकत आहेत. विशेष म्हणजे, 2015 मध्ये संसदेत जाहीर झालेल्या परदेशात बँक खाती लपवणा-या 100 भारतीयांच्या यादीत त्यांचे नाव 47 व्या क्रमांकावर होते. अ‍ॅड.   सूद यांनी केला.न्यायालयाचे आदेश डावललेः 1971 मध्ये संविधानाच्या कलम 373 (अ) नुसार सर्व हक्क आणि विशेषाधिकार रद्द झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, माजी राजे महाराजांच्या  खाजगी मालमत्तेवर अधिकार आणि विशेषाधिकार लागू होत नाहीत. संस्थानांच्या विलीनीकरणानंतर सर्व मालमत्ता त्या त्या राज्य सरकारच्या झाल्या होत्या. महाराष्ट् राज्य सोडता रामपूर, भोपाळ, पटियाला, गुजरात इ. ठिकाणी राजे महाराजांच्या मालमत्तेवर कृषी जमीन मर्यादा लागू केली आहे.

मुरुमाने ओव्हरलोड असलेला डंपर थेट धडकला बस स्टँडवर; दोघांचा मृत्यू

वकिलांची मागणीः

अ‍ॅड.सोनिया राज सूद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, त्यांनी माजी नवाबांच्या जमिनींची विक्री तात्काळ थांबवावी आणि अतिरिक्त शेती जमिनी गरजूंना वाटून द्याव्यात. कमाल मर्यादेपेक्षा जास्त जमिनी आधीच विकल्या गेल्या असल्यामुळे, कोणत्याही भरपाईची गरज नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. अ‍ॅड. सूद या अ‍ॅड मंगेश घोणे न्याय सबका अधिकारी या ट्रस्टकडून मदत मागणा-या गरीब आणि भूमिहीन लोकांच्या प्रकरणांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

दिवाळीत खासगी बसवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरू; सध्या तिकीटाचे दर किती?

Web Title: Raigad news big uproar over implementation of ceiling law question mark over 4500 acres of janjira nawabs land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • Alibag
  • Law And Order
  • Marathi News

संबंधित बातम्या

Thane : ठाण्यात भाजपची निवडणूक पूर्व तयारी; ५०० कार्यकर्त्यांसोबत बैठक
1

Thane : ठाण्यात भाजपची निवडणूक पूर्व तयारी; ५०० कार्यकर्त्यांसोबत बैठक

Dhule : रस्त्याच्या दुरावस्थेला नागरिक त्रस्त; तालुक्यात गावकऱ्यांचे अनोखे आभार आंदोलन
2

Dhule : रस्त्याच्या दुरावस्थेला नागरिक त्रस्त; तालुक्यात गावकऱ्यांचे अनोखे आभार आंदोलन

Panvel : पनवेलमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर भाजपचं आंदोलन
3

Panvel : पनवेलमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर भाजपचं आंदोलन

Bridgestone India मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स 2025 मधील विजेत्यांना मिळाले ‘इतके’ लाख रुपये
4

Bridgestone India मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स 2025 मधील विजेत्यांना मिळाले ‘इतके’ लाख रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.