मुरुमाने ओव्हरलोड असलेला डंपर थेट धडकला बस स्टँडवर; दोघांचा मृत्यू (संग्रहित फोटो)
नाशिक येथील खलाणे येथे अपघात झाला. या अपघातात मुरुमाने ओव्हरलोड असलेला डंपर भेट गावाच्या पत्री बस स्थानकावर धडकला. यात बस स्थानकाचा पूर्ण चक्काचूर झाला. यात एका महिलेचा डंपरखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर शेडमध्ये बसलेल्या एका पुरुषाला डंपरच्या धडकने जीव गमावावा लागला. मुरूम भरलेला (एमएच ०८ एपी १२८२) या क्रमांकाचा डंपर सकाळी नऊच्या सुमारास खखलाणे गावाकडे येत होता.
बस स्थानक परिसरात उतार असल्याने या उतारावरून जाणाऱ्या ओव्हरलोडेड डंपर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा डंपर सरळ बस स्थानकावर चढला. डंपरच्या धडकेने बस स्थानकाचा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघातात आशाबाई रुपचंद भील (वय 53, खलाणे) ही महिला डंपरखाली अडकली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर मका पारसा पावरा (वय 53, ब्राम्हणपुरी ता. शहादा) हे बस स्थानकाच्या डेअरीजवळ सोनगीरला बाजारास जाण्यासाठी बसले होते. तेही दूर फेकले गेले. यातच त्यांचा मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : Vijay Deverakonda Accident: विजय देवरकोंडाच्या कारचा भीषण अपघात! रश्मिकाशी नुकताच झाला होता साखरपुडा; चाहत्यांकडून चिंता व्यक्त
दरम्यान, डंपरच्या धडकेने आणखी दोन जखमी झाले आहेत. खलाणे येथील लताबाई शिवाजी भील (वय ४०) व विमलबाई भगवान भील त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे.
परिसरात शोककळा
घटनास्थळी ठाण्याचे पोलिस पाटील मनोज भदाणे, ग्रामपंचायत सदस्य रोशन टाटीया, माजी सरपंच विजय टाटीया, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम आदी प्राथमिक माहिती मिळताच तहसीलदार नितीन देवरे, शिंदखेडा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांनी घटनास्थळी भेट दिली व मदत कार्य ताबडतोब सुरू केले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करुन या प्रकरणाची सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
कोल्हापुरात भीषण अपघात
सातेरी डोंगरावर भीषण अपघात झाला. सातेरी देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना कारवरील ताबा सुटल्याने कार सुमारे शंभर फूट खाली कोसळली. या अपघातात दत्तात्रय रघुनाथ पवार (वय ३२ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (वय २८ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) हे दाम्पत्य जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.