Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : धावत्या बसचं चाक निखळलं अन्… आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Raigad News : मुरुड आगाराची नव्याने सुरू करण्यात आलेली मुरुड बोरीवली एस.टी बसचा तिसऱ्या दिवशी धावत्या गाडीचे डाव्या बाजुचे चाक निखळले, सुदैवाने पाठीमागून येणाऱ्या देवदूत मोटारसायकल स्वाराच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 25, 2026 | 05:02 PM
murud news

murud news

Follow Us
Follow Us:
  • धावत्या बसचं चाक निखळलं अन्…
  • आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
रायगड :  मुरुड आगाराची नव्याने सुरू करण्यात आलेली मुरुड बोरीवली एस.टी बसचे डाव्या बाजुचे चाक निखळले, सुदैवाने पाठीमागून येणाऱ्या देवदूत मोटारसायकल स्वाराच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. चाकाचे आठ नट निघून गेल्याने मोठा अपघात होता होता वाचला. ही घटना अलिबाग कुरूळ येथे रविवारी रात्री घडली. याच परिसरात मुरुड गाडीचे चाक निखळण्याची दुसरी घटना घडली आहे. अशा पद्धतीच्या प्रवाशांना गाड्या देऊन आगार व्यवस्थापक प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप यावेळी प्रवाशांनी केला आहे.

मुरुड आगारातून दिनांक 22 मे 2026 रोजी मुरुड बोरवली व बोरवली मुरुड अशी रातराणी सेवा प्रवासासाठी सुरू करण्यात आली आहे. रविवार दिनांक 24 मे रोजी ही सेवा सुरू केल्यापासून तिसऱ्या दिवशी मुरुड आगाराची MH 20 BL 3899 साडेदहाच्या सुमारास मुरुड बोरवली एसटी सुटली होती. ही बस कुरुळ नजीक येताच मागील डाव्या बाजुच्या चाकातील आठच्या आठ नट निघून चाक निखळले. सुदैवाने पाठीमागून येणाऱ्या देवदूत मोटारसायकल स्वाराच्या समोर चाक निखळल्याने मोटार सायकल स्वाराने प्रसंग सावधान राखून एसटी ड्रायव्हरला सूचना करून गाडी थांबवली. त्यामुळे देवदूत ठरलेल्या मोटरसायकल स्वारामुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले.

Murud-Janjira Fort : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! 26 मेपासून ‘हा’ किल्ला 3 महिन्यांसाठी बंद, पावसाळी सुरक्षेचा निर्णय

मुरुड एसटी आगाराचे व्यवस्थापक काय करत असतात? असा प्रश्न सर्व प्रवाशांना व नागरिकांना पडला आहे. मुरुड गाडीचे चाक निखळल्याचे तेही अलिबाग कुरुल परिसरात घडलेली दुसरी घटना आहे. यावरून असे लक्षात येते की मुरुड आगारातील सर्व बसेसचे मेंटेनन्स व्यवस्थित होत नाही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुरुड बस आगाराच्या एसटीतील प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत.

अशा या बेजबाबदार आगार व्यवस्थापकाची बदली करण्यात यावी व या ठिकाणी सक्षम आगार प्रमुख नेमावे अशी मागणी मुरुड नागरिकांतून व सर्व प्रवासी वर्गातून जोर धरत आहे.मी या गाडीने प्रवास करीत होतो कुरूळ च्या अलीकडे एका मोटर सायकल स्वाराने एसटी ड्रायव्हरला मागून येऊन गाडीचे चाक निखळल्याचे सांगितले त्यावेळी ड्रायव्हरने बस थांबवली हा मोटरसायकल स्वार देवदूतसारखा धावून आल्याने आम्हा प्रवाशांचे प्राण वाचले. त्यामुळे त्या मोटरसायकल स्वाराचे सर्व प्रवाशांचे वतीने आभार रात्रीची वेळ असल्यामुळे या मोटरसायकल स्वाराचे नाव समजून शकले नाही. अशी माहिती जितेंद्र मुंबईकर या प्रवाशाने दिली.

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

Web Title: Raigad news the wheel of a running bus came off and the depot manager played with the lives of the passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Murud
  • navarshtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली
1

Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.