कर्जत/ संतोष पेरणे : पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन म्हणजे माथेरान राणीची अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा पर्यटकांच्या पसंतीला उतरली आहे.शटल सेवा पावसाळ्यात देखील सुरू राहणार असून नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालविली जाणारी मिनी ट्रेन पावसाळी सुट्टीवर गेली आहे.26 मे पासून नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन अतिवृष्टी मुळे बंद ठेवण्यात आली होती,त्यानंतर एक जून पासून 15 ऑक्टोबर पर्यंत पावसाळी सुट्टीवर पाठवण्यात आली आहे.
मध्य रेल्वे माथेरान ते अमन लॉज नेरळ या मार्गावर चालविली जाणारी प्रवासी सेवा पावसाळ्यात बंद ते अन्याय येते.त्याप्रमाणे यावर्षी एक जून रोजी मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यावर्षी 26 मे पासून अतिवृष्टी असल्याने प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती.त्यानंतर एक जून पासून 15 ऑक्टोबर पर्यंत मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक बंद केली आहे.मागील वर्षी मिनी ट्रेन ची नेरळ माथेरान नेरळ मार्गावरीप प्रवासी वाहतूक 5 जून रोजी तर 2023 मध्ये हीच प्रवासी वाहतूक 8 जून रोजी बंद करण्यात आली होती.मात्र पावसाळ्यात माथेरान ते अमन लॉज दरम्यान मिनी ट्रेनची शटल सेवा सुरूच राहणार आहे.माथेरान अमन लॉज मार्गावर आठवड्याच्या दिवशी सहा फेऱ्या आणि शनिवार/रविवारी आठ फेऱ्या सेवा चालवणार आहे.
तथापि, या कालावधीत माथेरान- अमन लॉज दरम्यान शटल सेवा वेळापत्रक
माथेरान-अमन लॉज शटल सेवा
(अ) माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनंदिन)
पहिली फेरी 52154 सकाळी 8.20 माथेरान ते अमन लॉज
दुसरी फेरी 52156 सकाळी 9.10 माथेरान ते अमन लॉज
तिसरी फेरी 52158 सकाळी 11.35 माथेरान ते अमन लॉज
चौथी फेरी 52160 दुपारी 2.00 वाजता माथेरान ते अमन लॉज
पाचवी फेरी दुपारी 3.15 वाजता माथेरान ते अमन लॉज
सहावी फेरी संध्याकाळी 5.20 वाजता माथेरान ते अमन लॉज
(शनिवार/रविवार विशेष फेरी )
विशेष फेरी -: माथेरान ते अमन लॉज 10.5 वाजता माथेरान ते अमन लॉज
विशेष फेरी -: दुपारी 1.10 वाजता माथेरान ते अमन लॉज
विशेष फेरीअमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनंदिन)
विशेष फेरी52153 सकाळी 8.45 अमन लॉज ते माथेरान
विशेष फेरी 52155 सकाळी 9.35 अमन लॉज ते माथेरान
विशेष फेरी52157 दुपारी 12.18 अमन लॉज ते माथेरान
विशेष फेरी 52159 दुपारी 2.43 अमन लॉज ते माथेरान
विशेष फेरी 52161 दुपारी 3.40 अमन लॉज ते माथेरान
विशेष फेरी 52163 संध्याकाळी 5.45 अमन लॉज ते माथेरान
असं वेळापत्रक पर्यटकांसाठी जारी करण्यातआलेलं आहे.