फोटो सौजन्य- प्रतिनिधी
रायगड माणगाव येथील रवाळजे गावात येथे दु:खद घटना घडली. गावातील कुंडलिका नदीच्या पात्रामध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्यांचा नदीवर गेले असताना तेथे त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या बुडालेल्यांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. बचाव पथकाला दोघांचे मृतदेह सापडले असून अद्याप दोन मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.
माणगांव तालुक्यातील साजे येथे कपडे धुण्यासाठी गेले होते. सदरील कुटूंब हे नवीमुंबई येथील रहिवासी असुन शिरवली येथे आजीच्या गावी आले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दि. ७ डिसेंबर रोजी साजे येथे कपडे धुवायला गेले असता एक जण पाण्यात पडला. तेव्हा वाचविण्यासाठी गेलेले तीन जण सुद्धा पाण्यात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस व रेस्कु टीम घटनास्थळी दाखल झाली. या घटनेत जणांचे मृतदेह पोलिसांना सापडले असुन दोन जणांचे शोधकार्य सुरू आहे.
सिद्धेश सोनार वय 21,काजल सोनार वय 26, सिद्धी पेडेकर वय 16, सोनी सोनार वय 27 कपडे धुण्यासाठी रवळजी हद्दीतील कुंडलिका नदीवर सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान गेले होते.शिरवली गांवचे असून ते मुंबई येथे स्थायिक असतात.
सिद्धेश सोनार आणि सिद्धी पेडेकर यांचे मृतदेह मिळाले असून उर्वरित दोन तरुणी बेपत्ता रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवली.घटनास्थळी पोलीस व स्थानिक नागरिक शोध पथक उपस्थित होते.या घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दु:खद घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.
कळंबोलीत ओसाड खोलीत रक्ताचा सडा
कळंबोली परिसरात एका ओसाड खोलीत रक्ताचा सडा पडल्याने खळबळ उडाली आहे. पनवेल ग्रामीण कळंबोली वसाहतीमधील एका उद्यानात पालिकेमार्फत बांधण्यात आलेल्या एका खोलीत सर्वत्र रक्ताचा सडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या बाबत स्थानिक पोलिसांनी हे रक्त एखाद्या जखमी श्वानाचं असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र अद्यापही या प्रकरणावर ठोस पुरावा हाती लागला नसून पोलिसांचा तपास सुरु आहे. कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 3 येथे सिडकोच्या माध्यमातून उद्यान विकसित करण्यात आले आहे.बाबा गार्डन परिसरात पालिकेच्या मध्यमातून विविध कार्यक्रमांसाठी स्टेज तसेच काही खोल्यांचं बांधकाम करण्यात आलं आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर या खोल्या कुलूपबंद करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने गर्दूले आणि मद्यपान करणारे या खोल्यांचा वापर करत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे.त्यातच शुक्रवारी ( ता. 6) काही नागरिकांना अशाच एका खोलीत रक्ताचा सडा दिसून आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.