Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील सर्वात गूढ देवस्थान; वारुळातून अवतरलेल्या सातेरी देवी मंदिराची रहस्यमय कथा

कोकणातील एक असं गूढ देवस्थान आहे जिथे एका वारुळातून देवी अवतरली अशी आख्यायिका सांगितली जाते. 700 वर्षांपूर्वी असं काय घडलं की हे देवस्थान इतकं रहस्यमय आहे ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 03, 2026 | 04:14 PM
कोकणातील सर्वात गूढ देवस्थान; वारुळातून अवतरलेल्या सातेरी देवी मंदिराची रहस्यमय कथा
Follow Us
Close
Follow Us:
  • कोकणातील सर्वात गूढ देवस्थान
  • वारुळातून अवतरलेल्या सातेरी देवी मंदिराची रहस्यमय कथा
कोकणातल्या गजाली जशा प्रसिद्ध आहेत तशाच तिथल्या कथा देखील रहस्यमय आहेत. यात जशा भुतांच्या कथा आहेत तशाच देवस्थानाच्या देखील आहेत. तळकोकणातील सर्वात जागृत देवस्थान म्हणजे सातेरी देवीचं मंदिर. वेंगुर्ले तालुक्यात जसं तीचं मुख्य स्थान आहे तसंच सिंधुदुर्गातल्या पावशी गावात देखील तिचं जागृत मंदिर आहे.

या मंदिराचंदेखील एक रहस्य आहे. पावशीमधील ही देवी चक्क वारुळातून अवतरली असं म्हटलं जातं. या देवीच्या मंदिराची एक दंतकथा सांगितली जाते. याबाबतची माहिती सोहम रांगणेकर या व्लॉगर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देण्यात आली. गावकऱ्यांनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार, सुमारे 700 वर्षांपूर्वी पावसगावात एक गुढ घटना घडली होती. ज्या ठिकाणी सातेरी देवीचं मंदिर आहे तिथे कधी काळी एक घर होतं. त्या घरातल्या स्वयंपाक घरात वारुळ तयार व्हायचं. घरातल्या मंडळींनी हे वारुळ काढून टाकलं. मात्र पुन्हा पुन्हा सतत हे वारुळ यायला लागलं. एकेदिवशी असचं वारुळ काढताना ते वारुळ माणसाच्या उंचीपेक्षाही मोठं झालं. ही घटना सामान्य नव्हती यामागे काही देैवी कारण होतं हे तिथल्या घरातील कुटुंबाला कळून आलं. या वारुळाची उंची इतकी की, ते तब्बल 20 ते 25 फूट उंच वाढलं. हे वारुळ पाडणं देखील शक्य झालं नाही.

 

Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते

स्वयंपाक घरातील हे वारुळ जेव्हा मोठं झालं त्यावेळी सातेरी देवीने कुटुंबातील सदस्यांना दृष्टांत दिला. त्यानंतर ही खबर गावात परसली. वैशाख महिन्यात याठिकाणी सातेरी देवीची जत्रा भरते. आजही या ठिकाणी देवीच्या मंदिरात वारुळ दिसतं. हे वारुळ आजही 20 ते 25 फूट उंच आहे. वारुळात देवी वास करते म्हणून नित्यनेमाने या वारुळाची पूजा केली जाते. गावकऱ्यांची श्रद्धा अशी की आजही या वारुळात देवी वास करते. जत्रेच्या वेळी गावकरी तांदळाच्या पेजेने हे वारुळ स्वच्छ करतात. त्यानंतर त्याची रिसतर पूजा करतात. गावचं रक्षण करणारी ही देवी म्हणून हे जागृत देवस्थान असल्याचं म्हटलं जातं.

Budh Gochar 2026: बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, करिअर, पैसा आणि प्रगतीत होईल वाढ

Web Title: Mystry of sateridevi temple in pavashi villege sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • hindu religion
  • Kokan News

संबंधित बातम्या

हिंदी हनुमान चालिसा आणि मराठी मारुती स्तोत्र यांच्यात काय आहे फरक जाणून घ्या
1

हिंदी हनुमान चालिसा आणि मराठी मारुती स्तोत्र यांच्यात काय आहे फरक जाणून घ्या

Paush Purnima: पौष पौर्णिमेला आकाशात झळकणार पूर्ण चंद्र, जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व
2

Paush Purnima: पौष पौर्णिमेला आकाशात झळकणार पूर्ण चंद्र, जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

‘असं’ एक रहस्यमय मंदिर जिथे आजही श्री कृष्णाचं हृदय धडधडतं; काय आहे याचं गूढ?
3

‘असं’ एक रहस्यमय मंदिर जिथे आजही श्री कृष्णाचं हृदय धडधडतं; काय आहे याचं गूढ?

Sankashti Chaturthi: कधी आहे 6 की 7 अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
4

Sankashti Chaturthi: कधी आहे 6 की 7 अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.