Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मानवी मनोऱ्यांऐवजी चक्क २५ ते ४० फूट उंचीवरून खोल विहिरीत उडी मारून ही दहीहंडी फोडण्याची अनोखी परंपरा कुर्दुस गावात जपली जात आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कुर्डसच्या देऊळ आळीत मोठी गर्दी झाली होती.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 06, 2026 | 02:05 PM
Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

Follow Us
Follow Us:
  • विहिरीवर दहीहंडी: कुर्डुसच्या देऊळ आळीत विहिरीवर २५ ते ४० फूट उंचीवर दहीहंडी बांधली जाते.
  • धाडसी उडीचा थरार: गोविंदा विहिरीच्या काठावरून उंच उडी घेत हवेतच हंडी फोडण्याचे कौशल्य दाखवतात.
  • गावाची अनोखी ओळख: या आगळ्या परंपरेमुळे कुर्डुसची दहीहंडी परिसरासह बाहेरगावीही आकर्षणाचा विषय ठरत आहे.
अलिबाग: दहीहंडी म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो गोविंदांचा थरार, मानवी मनोरे आणि ‘गोविंदा आला रे’चा जल्लोष. मात्र, अलिबाग तालुक्यातील कुडुस गावात दहीहंडी फोडण्याची पद्धत काहीशी वेगळीच आहे. गावातील देऊळ आळीमध्ये चक्क विहिरीवर दहीहंडी बांधली जाते आणि गोविंदा विहिरीच्या काठावरून उंच उडी घेत ही हंडी फोडतात. मानवी मनोऱ्यांऐवजी चक्क २५ ते ४० फूट उंचीवरून खोल विहिरीत उडी मारून ही दहीहंडी फोडण्याची अनोखी परंपरा कुर्दुस गावात जपली जात आहे. गेल्या काही वर्षांपासूनची ही आगळी वेगळी परंपरा आता गोविंदा पथकांसह परिसरातील नागरिकांचेही आकर्षण ठरत आहे.

Raj Thackeray on Ganeshotsav 2026: ‘गणेशोत्सवात दंगल घडवणार…’ राज ठाकरेंच्या दाव्याने उंचवलेल्या सर्वांच्या भुवय्या

कुडुस गावाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीवर दहीहंडी बांधण्यात येते. विहिरीच्या काठावर उभे राहून गोविंदांना योग्य अंदाज घेत उंच उडी मारावी लागते. उडी घेतल्यानंतर हवेतच हंडी फोडण्याचे कौशल्य गोविंदांकडून दाखवले जाते. त्यामुळे पारंपरिक मानवी मनोऱ्यापेक्षा या दहीहंडीचा थरार वेगळाच अनुभवायला मिळतो.

गोविंदाच्या कौशल्याबरोबरच धाडसाचीही असते कसोटी

यंदाही दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कुर्डसच्या देऊळ आळीत मोठी गर्दी झाली होती. विहिरीवर बांधण्यात आलेली हंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. गोविदांनी उत्साहात उंच उड्या घेत हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. हंडी फोडताना गोविंदांच्या कौशल्याबरोबरच त्यांच्या धाडसाचीही कसोटी लागली. या अनोख्या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी कुर्द्धससह आजूबाजूच्या गावांमधूनही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विहिरीवर उंच उडी घेत हंडी फोडण्याचा थरार

गावात काहीतरी वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी सुरू केलेली ही विहिरीवरची दहीहंडी आता कुर्डस गावाची वेगळी ओळख बनत आहे. पारंपरिक दहीहंडीच्या उत्साहाला आगळ्या पद्धतीची जोड मिळाल्याने या उत्सवाबाबत गोविंदा पथकांमध्येही उत्सुकता वाढत आहे. उत्सवाच्या शेवटी विजेत्या गोविंदाचा गदा आणि चषक देऊन गौरव करण्यात आला, ढोल-ताशांचा गजर आणि विहिरीवर उंच उडी घेत हंडी फोडण्याचा थरार यामुळे उत्साहाचे वातावरण असते.

परंपरा व उत्सवाची रंगत

दरम्यान, या आगळ्या-वेगळ्या दहीहंडीच्या माध्यमातून गावची परंपरा आणि उत्सवाची रंगत जपण्याचा प्रयत्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे कुर्डसची ‘विहिरीवरची दहीहंडी’ आता गोविंदांसाठीच नव्हे, तर परिसरातील नागरिकांसाठीही उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहे.

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

‘ग्लोबल’ ओळख आणि ग्रामस्थांचा अभिमान

या परंपरेविषयी बोलताना स्थानिक ग्रामस्थ आणि नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई-नवी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या तरुणांनी आपला अभिमान व्यक्त केला. “आमच्या गावात जन्म घेतल्याचा आम्हाला मोठा अभिमान आहे. ही अनोखी परंपरा आज केवळ गावापुरती मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचली आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दहीहंडीच्या निमित्ताने बाहेरगावी राहणारे चाकरमानी आवर्जून गावात एकत्र येतात. हा सोहळा पाहण्यासाठी नामांकित पत्रकार, यूट्यूबर्स आणि अनेक मान्यवर दरवर्षी आवर्जून हजेरी लावतात. या स्पर्धेसाठी आकर्षक चषक तसेच बक्षिसे देवली जातात.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Alibag kurdus dahi handi 25 to 40 feet well jump unique govinda tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा
1

Raigad News: खड्ड्यांत हरवला व्हायरल खांडपे-कोंदिवडे रस्ता; प्रशासनाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
2

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
3

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा
4

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.