Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर तपासादरम्यान कारमध्ये आढळली लाखाेंची रोकड!

पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर आचारसहिंता पथकाद्वारे आज दि. 25 ऑक्टोबर 2024 ला करण्यात आलेल्या तपासामध्ये एका वाहनामध्ये लाखोंची रोकड आढळली असून तपास पथकाने ती जप्त केली आहे. 

  • By नारायण परब
Updated On: Oct 25, 2024 | 10:18 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी  15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारर्संहिता लागू झाली आहे. त्यानंतर राज्यात सर्वत्र तपासयंत्रणा कार्यरत झाल्या आहेत.  पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर आचारसहिंता पथकाद्वारे आज दि. 25 ऑक्टोबर 2024 ला करण्यात आलेल्या तपासामध्ये एका वाहनामध्ये 6 लाखांची रोकड आढळली ती पथकाने जप्त केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

पनवेल 188 विधानसभा मतदार संघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचार संहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ६ (एसएसटी पथक ) ने आज शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर 2024 रोजी पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे  वाहन तपासण्याचे नियमित कर्तव्य करत असताना सकाळी ११:५५  वाजण्याचे दरम्यान  गोवा-पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या राखाडी रंगाच्या टाटा पंच चार चाकी गाडीस थांबवून पथकाने तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्या गाडीमध्ये तब्बल 6 लाखांची रोख रक्कम आढळून आली. सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त करण्यात आली.

हे देखील वाचा-MVA Seat Sharing : मविआच्या फार्म्युल्याबाबत अजूनही सस्पेन्स कायम, दिल्लीतील कॉंग्रेसच्या बैठकीत नक्की काय ठरलं? वाचा सविस्तर

सदर कारवाई 188 पनवेल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक खर्च निरीक्षक विजय फासे, सहाय्यक खर्च निरीक्षक संजय आपटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कराड,आचार संहिता पथक प्रमुख  महेश पांढरे, आचार संहिता सनियंत्रण अधिकारी शरद गीते, सहाय्यक आचार संहिता पथक प्रमुख श्री.जी.एस.बहिरम, सहाय्यक आचार संहिता पथक समन्वयक  दिनेश भोसले, नितेश चिमणे,तुषार म्हात्रे तसेच पळस्पे फाटा चेक पोस्टवरील एसएसटी पथकाचे प्रमुख किरण पोकळे, कामोठे पोलिस स्टेशन ठाण्याचे पोलिस शिपाई  जितेश नवघरे,तळोजा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई प्रकाश म्हस्के, खारघर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई  हौसराव खकाळ उपस्थित होते.

हे देखील वाचा- सुधाकर घारेंकडून विराट शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल! कर्जतमध्ये भव्य पदयात्रा; २५ हजार समर्थक एकवटले

निवडणूक आचारसंहिता काळात राज्यभर अंमलबजावणी यंत्रणा तसेच तपास यंत्रणाकडून गैरप्रकार थांबवण्यासाठी मोठ्या फौजफाट्यासह तपास केला जात आहे. काल केवळ 24 तासामध्ये अंमलबजावणी यंत्रणांनी 50 कोटीहून जास्त रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला होता. ज्यांच्याकडूनही हा मुद्देमाल जप्त केला गेला आहे. अशा सर्वांवर योग्य त्या प्रकारची कारवाईही  या यंत्रणांकडून केली जात आहे.

सी-व्हिजिल ॲप (C-Vigil app)

 आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे  सी-व्हिजिल ॲप (C-Vigil app)  हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून सजग नागरिकांना डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे जर कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचा भंग झाला असेल तर त्याची तक्रार नागरिकांना करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. 

 

Web Title: Cash of 6 lakhs was found in the car during the investigation at the palaspe check post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 10:12 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Raigad News

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
1

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
2

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा
3

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.