Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जतमध्ये धरणग्रस्तांचे साखळी उपोषण सुरू; पाणी विकण्यास शेतकऱ्यांचा विरोध

पाटबंधारे विभागाने शासनाच्या वतीने दिलेल्या पत्रकात दिलेली आश्वासने यावर ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. असा आरोप प्रकल्प ग्रस्तांनी केला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2025 | 05:54 PM
कर्जतमध्ये धरणग्रस्तांचे साखळी उपोषण सुरू; पाणी विकण्यास शेतकऱ्यांचा विरोध

कर्जतमध्ये धरणग्रस्तांचे साखळी उपोषण सुरू; पाणी विकण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे :   पाली भुतिवली लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र विरोध दर्शविला आहे. आपल्या मागण्यांसाठी कर्जत प्रशासकीय भवन येथे २४ मार्चपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडून प्रकल्पग्रस्त समितीच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनाबाबत पाटबंधारे विभागाने शासनाच्या वतीने दिलेल्या पत्रकात दिलेली आश्वासने यावर ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी बोलावलेल्या बैठकीला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव,उप अभियंता संजीवकुमार शिंदे,शाखा अभियंता आकाश गवारे आणि प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे शासनाकडून फसवणूक होत असल्याने पाली भुतिवली धरण प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणाला त्या भागातील आसल,वडवली,बेकरे,आसलपाडा, भुतिवली,माणगाव,चिंचवली,उकरुळ,डिकसळ, गारपोळी, उमरोली, बार्डी, वावे, एकसल, कोषाने, पाली वसाहत आदी गावातील शेतकरी यांनी साखळी उपोषणाला पाठींबा दिला आहे.साखळी उपोषण सुरू झाल्यावर दुपारी तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि चर्चा केली. स्थानिक आठ दिवस साखळी उपोषण करून देखील आपल्या मागण्यांवर शासन निर्णय घेणार नसेल तर बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असे जाहीर केले आहे.

पाली-भुतिवली लघुपाटबंधारे प्रकल्पचे काम ४० वर्षांपासून सुरू आहे.आतापर्यंत ३०० कोटी रुपये या धरणाच्या कामावर खर्च झाले आहेत.धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने शेती करता येत नाही आणि शेती ओलिताखाली येत नसल्याने रोजगार देखील बुडत आहे. शासनाने धरणाचे पाणी तळोजा एम.आय.डी.सी.ला देण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक शेतकरी संतप्त झाले आहेत.

अन्यथा आमरण उपोषण..

पोलिस मित्र संघटनेचे कोकण अध्यक्ष रमेश कदम यांनी आपल्या संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला असून पाच दिवसात साखळी उपोषणात निर्णय झाला नाही तर आमरण उपोषण शेतकऱ्यांचे वतीने आपण करू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या..

१_कालव्यांची कामे त्वरित पूर्ण करावीत आणि जमिनी संपादन करून योग्य मोबदला द्यावा.
२_प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी,प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क द्यावेत.
३_ धरणाच्या कामासाठी वापरलेल्या जमिनीचे भू भाडे देण्यात यावे.
४_धरणातील पाणी केवळ सिंचन आणि पिण्यासाठी आरक्षित ठेवावे.
५_ ४० वर्षांपासून धरणाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे.
५_जून-जुलै २०२५ मध्ये पाणी विकत जात असलेल्या बिल्डर सोबत शासनाने करार करू नये किंवा मुदतवाढ देऊ नये.
६_धरणावर सुरू असलेली नौकाविहार सुविधा बंद करावी आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे.
७_ धरणासाठी जमिनी देणाऱ्या ६७ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घेणे
८_धरणाच्या बुडीत क्षेत्रात खोदकाम आणि खाणी उभारण्यास परवानगी देऊ नये.
९_खोदलेल्या कालव्यांच्या मार्गावर सुरू असलेले अतिक्रमण काढून टाकणे.

 

 

 

Web Title: Chain hunger strike of dam victims begins in karjat farmers oppose selling water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • karjat news

संबंधित बातम्या

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप
1

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन
2

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन

Karjat News : बिल्डरची दादागिरी अन् गृह प्रकल्पाचा मनस्ताप;  सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची जमीन होतेय उद्ध्वस्त
3

Karjat News : बिल्डरची दादागिरी अन् गृह प्रकल्पाचा मनस्ताप; सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची जमीन होतेय उद्ध्वस्त

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद
4

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.