
फोटो सौजन्य सोशल मिडिया
बार्डी गावातील नळपाणी योजनेचे काम हे वेळेत पूर्ण झाले नाही. बार्डी गावातील ग्रामस्थांना पाण्याची अडचण होत असल्याबद्दल 26 डिसेंबर 2025 आणि 18 मार्च 2026 रोजी कर्जत पंचायत समितीकडे लेखी निवेदन दिले होते. हे निवेदन देऊन सुद्धा या नळपाणी योजनेचे कामे पूर्ण झालेले नाही. हे काम करण्यासाठी वेळो वेळी पाठपुरावा केला आहे. या मध्ये बार्डी गावात ग्रामपंचायत मार्फत होणारा पाणीपुरवठा हा अतिशय अनियमित असून 3 ते 4 दिवसातून फक्त एकदाचं पाणी येते.
BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
तसेच येणारे पाणी हे अतिशय कमी दाबाने येत असून कित्येक घरांमध्ये पाणी देखील मिळत नाही. याबाबत आम्ही आपणास पत्र दिले होते. ग्रामपंचायत मार्फत या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तात्पुरते आश्वासन देऊन वेळ ढकलण्यात आले होते. पण यामध्ये कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती यांना भेट देऊन आणि लेखी निवेदन देऊन देखील बार्डी गावातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
शासनाकडून आणि जिल्हा परिषद कडून नळपाणी योजना पूर्ण होण्यासाठी कोणतेही सहकार्य पाणी पुरवठा विभागाने केलेले नाही. त्यामुळे कर्जत पंचायत समितीमध्ये मोर्चादरम्यान संबंधित अधिकारी किंवा जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने महिलांनी तब्बल अडीच तास ठिय्या मांडत संताप व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांच्या मध्यस्थीने पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कर्जत पंचायत समिती कडून कार्यवाही झाली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा महिला वर्गाने दिला आहे. या मोर्चात महिला आणि गावातील माजी सदस्य तसेच माजी उपसरपंच आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
Thane News: ठाण्याच्या डॉक्टरचा विदेशात डंका, डॉ. निलेश पोतदार यांना Asia’s Modern Hero Award