नवी मुंबई, सिद्धेश प्रधान :- दिल्ली विधानसभा निवणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशी येथील भारतीय जनता पार्टी जन संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसह फटाके फोडून आणि पेढे भरवून जल्लोष केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपानं अरविंद केजरीवाल यांच्या सत्तेला सुरुंग लावत दिल्लीत मोठ यश मिळवलं आहे.तसेच त्या पुढे म्हणाल्या की, विकास हवा असेल तर भाजप आणि नरेंद्र मोदींचेच नेतृत्व हवे आहे दुसरा पर्याय नाही असे विधान यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार बांधवांशी बोलतांना सांगितले.त्याच बरोबर आज दिनांक 08 फेरबुवारी 2025 रोजी भारतीय जनता पार्टी, जन संपर्क पक्ष कार्यालयात “जनसंवाद मेळाव्याला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
नेहमी प्रमाणे त्यांच्या वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात “जनसंवाद मेळाव्या” घेण्यात आला यावेळी वाशी विभागातील तसेच नवी मुंबईतील सारसोळे, नेरुळ, तुर्भे व कोपरखैरणे आणि घणसोलीतील अनेक नागरीकांनी त्यांच्या कामानिम्मित्त भेट घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने महीला, जेष्ठ नागरीक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. विरंगुळा केंद्र, निवारा शेड, नवीन धार्मीक स्थळांसंदर्भातील न.मुं.म.पा व सिडको संबंधित विविध कामे आदी गोष्टींचा त्यात समावेश होता. यांनी सदर कामासंदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क करुन सदर कामे मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच सदर प्रसंगी नवी मुंबई स्पोर्ट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाचे राजु शिंदे हे व्यवस्थापनाच्या सदस्यपदी निवडुन आल्याने त्यांचा सत्कार ही करण्यात आला. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत अनिल कौशिक, माधवी शिंदे, विकास सोरटे, मुकुंद विश्वासराव, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर, राखी पाटील, प्रमिला खडसे, मालती सोनी, मंगेश चव्हाण, महेश दरेकर, जेम्स आवारे, प्रविण चिकणे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान दिल्लीकरांनी भाजपा सरकराला निवडून दिल्याने आता सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार हे पाहणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणते नेते आघाडीवर आहेत आणि त्यांच्या दावेदारीमागील प्रमुख कारणे काय आहेत? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक सक्षम दावेदार आहेत. प्रवेश वर्मा, वीरेंद्र सचदेवा, मनोज तिवारी आणि विजेंद्र गुप्ता. पक्ष वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय काय असेल, हे लवकरच स्पष्ट होईल, मात्र दिल्लीच्या राजकारणात हा निर्णय मोठ्या बदलांचे संकेत देणारा ठरू शकतो.