
‘किसान क्राफ्ट महाराष्ट्र’ने कर्जत येथील शेतकऱ्यांसाठी ड्राय डायरेक्ट पेरणी भात (DDSR – Dry Direct Seeding Rice) तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे यशस्वी आयोजन केले होते. भात लागवडीसाठी आवश्यक पाणी, मजुरीचा खर्च आणि ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणाऱ्या या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना करून देण्यात आली.
किसान क्राफ्ट ही आयएसओ प्रमाणित उत्पादक आणि उच्च दर्जाच्या कृषी उपकरणांची वितरक आहे, जी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करते. कर्जत तालुक्यात आयोजित केलेल्या या शेती प्रशिक्षण शिबिरात ड्राय डायरेक्ट पेरणी भात (DDSR) तंत्रज्ञानाचे फायदे समजावून सांगण्यात आले:
शेतकरी विनय वेखंडे यांच्या शेतावर हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी किसान क्राफ्टचे सौरभ पाटील, स्मित कदम, बसवराज आणि यादव यांनी शेतकऱ्यांना DDSR तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास विनय वेखंडे, जगदीश पाटील, परम पाटील, चंद्रकांत जाधव, भगवान चव्हाण, कृष्णा चव्हाण, विजय, बळीराम मांडावले, अनिल देशमुख, भरत जाधव आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
भात पीक हे भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते. मात्र, पाणीटंचाई आणि ज्ञानाचा अभाव यांसारख्या समस्यांमुळे याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होतो. या समस्यांवर मात करण्यासाठी, किसान क्राफ्टने DDSR तंत्रज्ञानाची नवीन पद्धत विकसित केली आहे. ‘लोकल फॉर व्होकल’ (Local for Vocal) चा भाग म्हणून कंपनी उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणी GSR (Direct Seeding Rice) लागवडीला प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे केवळ पाण्याची गरज कमी होत नाही, तर ते पर्यावरणास अनुकूल देखील आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी जमिनीच्या सुपीकतेनुसार जास्त उत्पादन मिळवू शकतात.