अलिबाग-वडखळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पोहून वाहनचालकाचे आंदोलन
अलिबाग-वडखळ महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच भीषण होत चालली आहे. रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे आणि त्यामध्ये साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल अक्षरशः हाल होत आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहनाचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता सतत निर्माण होते. त्यामुळे प्रवास हा केवळ कष्टदायकच नव्हे तर जीवघेणाही ठरतोय.
महामार्गाच्या या बिकट अवस्थेकडे शासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी आज एका वाहनचालकाने अनोखा मार्ग अवलंबला. त्याने महामार्गावरील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये उडी मारून पोहण्याचा कार्यक्रम केला. या आंदोलनामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे लक्ष वेधले गेलेच, शिवाय शासनाच्या निष्क्रीयतेविरुद्ध जोरदार संदेशही देण्यात आला.
अलिबाग हे कोकणातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रसिध्द पर्यटन स्थळ मानले जाते. देश-विदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात. परंतु पर्यटनाच्या दृष्टीने इतक्या महत्त्वाच्या असलेल्या या महामार्गावर खड्डेच खड्डे असल्याने पर्यटकही संतापले आहेत.
Maharashtra Rain Alert: घराची दारं, खिडक्या बंद करा! महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार, पुढील काही तास…
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे निधी रस्ते दुरुस्तीसाठी खर्च झाल्याचे दाखवते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाही. ठेकेदार व अधिकाऱ्यांची ढिलाई आणि भ्रष्टाचारामुळे रस्त्याची दुरवस्था अधिकच गंभीर बनली आहे. पावसाळ्यात तर खड्ड्यांमुळे प्रवास करताना वाहनांचे मोठे नुकसान होत असून, अनेकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
पर्यटक आणि स्थानिकांसोबतच रोज या मार्गाने प्रवास करणारे एसटी बसचालक व खाजगी वाहनचालकही हैराण झाले आहेत. अपघातांच्या भीतीने प्रवास टाळणारे प्रवासी आता पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासावर अवलंबून असलेले व्यवसायिक व व्यापारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…
शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन महामार्गाची दुरुस्ती करावी, ही सर्वांची मागणी आहे. अन्यथा स्थानिक नागरिक आणि संघटना आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. “आंदोलनं होत राहतील पण खड्डे कधी भरणार?” हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात घोंगावत आहे.