राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
राज्यात पावसाचा जोर वाढणार
बंगालच्या उपसागरात तयार झाला कमी दाबाचा पट्टा
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
घाटमाथा, कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे संकट अजूनही कायम आहे.
राज्यावरील पावसाचा धोका अजून टळलेला नाही. पुढील काही तासांमध्ये आणि पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अनेक राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेट. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत.
शनिवारपासून मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे, मुंबई महानगरपालिकेची यंत्रणाही काम करत आहे. महानगरपालिकेने सांगितले की, वादळी पाण्याचा निचरा आणि घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी, अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके वॉर्ड पातळीवर काम करत आहेत. दिवसभर मुंबईच्या कोणत्याही भागात पाणी साचल्याची घटना घडली नाही. महानगरपालिकेने असेही स्पष्ट केले की भूस्खलन झाले नाही. पावसामुळे फक्त अंधेरी मेट्रो तात्पुरती बंद होती, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. ढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ऑरेंज अलर्टनुसार मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. बृहन्मुंबई प्रदेश, पालघर जिल्हा आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.