अलीकडच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या गुंतवणूकदारांकडून जमिनी खरेदी केली जात आहेत. परिणामी, स्थानिक शेतकरी आपली जमीन विकून उपजीविकेच्या साधनांपासून वंचित होत आहेत.
सदर खटल्याची सुनावणी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात घेण्यात आली, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता प्रसाद पाटील यांनी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
रायगडच्या कनकेश्वर मंदिर परिसरात सोशल मीडियावरून ओळखलेल्या तरुणाने प्रेयसीवर लोखंडी हातोड्याने हल्ला केला. ती गंभीर जखमी असून आरोपी आणि त्याच्या मित्रांचा शोध पोलिस करत आहेत.
अखेर कामगारांच्या हक्करक्षणासाठी अलिबागमध्ये नवीन न्यायालयाचे उद्घाटन झाले आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते या न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
बॉलीवूडचा शहेनशाह ११ ऑक्टोबर रोजी ८३ वर्षांचा झाला. बिग बी यांनी स्वतःला एक अद्भुत भेट दिली आहे. मुंबईजवळील अलिबागमध्ये या अभिनेत्याने कोट्यावधीच्या 3 जागा विकत घेतल्या आहेत
राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग खड्यांच्या समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहेत. अलिबागपासून वडखळ रस्ता केवळ 22 किमीचा. 22 किमीचा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत दुरवस्थेत असून जीवघेणा होत आहे.
जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन करत – MSIDC व कंत्राटदाराला जाहीर इशारा दिला आहे.
लोकांनी केलेल्या मतदानाची चोरी होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केला होता याच पार्श्वभूमीवर रायगड काँग्रेसने कॅन्डल मार्चचं आयोजन केलं.
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागाव मध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. नागाव परिसर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी या ऑकेथॉन मध्ये गावकऱ्यांसह विद्यार्थी देखील सहभागी झाले…
अलिबागमध्ये मराठी पाटी नसल्यामुळे मनसेने आक्रमक आंदोलन करत संबंधितांना समज दिली असून, १५–२० दिवसांत मराठी फलक न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अलिबागमध्ये रस्त्यावरील खड्डे, संजय निराधार योजनेचे पैसे व अतिक्रमण यावर तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या आदेशानुसार आणि डॉ. निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग समुद्रकिनारी ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक युवक-युवतींनी जोमदार सहभाग घेतला.