आदिवासी समाज आक्रमक! दिलीप भोईर यांचा सरकारला 'अंतिम' इशारा
अलिबाग जिल्हा प्रतिनिधी: आदिवासी समाजाच्या मागण्या आणि समस्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि आदिवासी नेते दिलीप भोईर यांनी आज पत्रकार परिषदेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. भोईर यांनी स्पष्ट केले की, आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्ते जाम करून राज्यभर आंदोलन करण्याची आमची पूर्ण तयारी आहे.
दिलीप भोईर यांनी आपल्या मनोगतात एसटी (ST) आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची भूमिका ठामपणे मांडली. भोईर म्हणाले, “आम्ही आदिवासी समाजाच्या आरक्षणावर ठाम आहोत. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण जर एसटी (ST) प्रवर्गातून कोणी आरक्षण मागत असेल, तर याला आमचा तीव्र विरोध असेल. “जर आमच्यातून कोणी मागत असेल, तर यापुढे तीव्रता आणि आंदोलन करण्याची, सगळे रस्ते वगैरे जाम करण्याची पूर्ण तयारी आहे.” यासाठी आदिवासी, कोळी आणि ठाकूर समाजाला एकत्रित आणण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा: Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प
दिलीप भोईर यांनी यावेळी आदिवासी भागातील दोन प्रमुख समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले.
दिलीप भोईर यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून आदिवासी समाजाची तीव्र नाराजी व्यक्त करत, सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच प्रत्येक तालुका स्तरावर विचारमंथन बैठक घेण्यात येणार आहे. केंद्र किंवा राज्य सरकारने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास, पूर्ण जिल्ह्याला निवेदन देऊन सगळं बंद करण्याची (जिल्हा बंद) तयारी असल्याची माहिती भोईर यांनी दिली.