कर्जत/ संतोष पेरणे : शहरात नगरपरिषदमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने सर्व कामे अधिकारी वर्ग पाहत असून अधिकारी वर्गाचा अंकुश नाही. त्यामुळे शहराचे नियोजन बिघडले असून शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या कुत्र्यांवर अटकाव करण्याचे कोणतेही नियोजन नाही. या कुत्र्यांची दहशत वाढत जात असून नागरिकांना बाहेर पडणं भितीदायक झालं आहे.
कर्जत नगरपरिषद भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आग्रही नसल्याचे दिसून येत आहे.कर्जत नगरपरिषद कडून शहरातील भटक्या आणि मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निरबिर्जीकरण करण्याचा प्रयोग राबविला होता.त्यासाठी निविदा काढण्यात आली होती,परंतु पालिका प्रशासनाने कुत्र्यांचे निर्बीजीकरण कार्यक्रम कधी बंद केला हे कळले देखील नाही. शहरात पकडलेले कुत्रे पालिकेकडून डंपिंग ग्राउंड येथे नेऊन सोडून देण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत असतात.
शहरात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले गेले तर मग एवढे मोठे प्रमाणात कुत्रे पुन्हा शहरात दिसतात कसे असे प्रश्न नागरिक उपस्थितीत करीत आहेत.कर्जत शहरात कुत्र्यांच्या धुंडी दिसत असून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा कार्यक्रम पालिकेने खरेच राबवला होता काय? की नुसता दिखाऊपणा होता असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करीत आहेत.
सध्या सणासुदीच्या काळात कुत्र्यांची झुंबड शहराच्या विविध भागात दिसून येत आहेत. शहरात एवढे कुत्रे वाढले असून हे आले तरी कुठून असा प्रश्न नागरिकांनी उपास्थित केला आहे.शहरात देवीच्या मंदिरात जाण्यासाठी निघणाऱ्या महिला या कुत्र्यांना बघून घाबरून घरी परतत असल्याचे चित्र आहे.
डेक्कन जिमखाना आणि पिंटो गॅस सेंटर चे बाजूला तर चाळीस पन्नासचे संख्येने कुत्रे एका ठिकाणी उभे असतात. त्यामुळे घरात एकट्या असलेल्या महिलांना आपल्या नातवांना मुलांना शाळेतून घरी आणणे कठीण झाले आहे.कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासन करणार आहे किंवा नाही हे पालिकेने एकदा जाहीर करावे अशी मागणी नागरिक किशोर तावरे यांनी केली आहे.तर मोकळे आणि सुटसुटीत घरे बंगले असलेल्या मुद्र नाना मास्तर भागात तर कुत्र्यांची जत्रा भरली आहे काय असा प्रश्न येथील नागरिक देशमुख यांनी उपस्थित केला आहे.नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता तत्काळ भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम कर्जत नगरपरिषद हाती घेणार आहे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
रत्य़ावरील या कुत्र्यांमुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गात मोठी दहशत निर्माण झाली. वाढत्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर हल्ला झाला किंवा कोणाच्या जीवावर काही बेतण्याचा धोका जास्त आहे त्यामुळे ढिम्म प्रशासनाने याबाबत काय तो तोडगा काढावा असं नागरिकांनी आवाहन केलं आहे.