Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : बकरी फार्मला भीषण आग; 400 बकऱ्या मृत आणि 350 कबुतरांचा होरपळून मृत्यू

कर्जत- नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या गोट फार्म मध्ये आग लागली. या आगीमध्ये तब्बल 400 बकऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या ठिकाणी रात्रीच्या वेळी लागल्याने मदतकार्य मिळण्यात अडचणी आल्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 27, 2026 | 02:17 PM
Karjat News : बकरी फार्मला भीषण आग; 400 बकऱ्या मृत आणि 350 कबुतरांचा होरपळून मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:
  • बकरी फार्मला भीषण आग;
  • 400 बकऱ्या मृत आणि 350 कबुतरांचा होरपळून मृत्यू
कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत- नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या गोट फार्म मध्ये आग लागली. या आगीमध्ये तब्बल 400 बकऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या ठिकाणी रात्रीच्या वेळी लागल्याने मदतकार्य मिळण्यात अडचणी आल्या. या आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, मुख्य प्राण्यांचा बळी यात गेला आहे. दरम्यान गोट फार्मच्या मालकाचे या आगी मध्ये तब्बल दीड कोटींचे आर्थिक नुकसान झाले.

कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ जवळील माणगाव गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला राबीया बकरी फार्म आहे. माणगाव येथे मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रात्री सुमारे 1.30 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून या दुर्घटनेत सुमारे 300 ते 400 बकऱ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मध्यरात्री फार्म परिसरातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही मिनिटांतच आग बकरी पालन करण्यासाठी उभारलेल्या शेड्समध्ये पसरली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की बकऱ्यांना बाहेर काढण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. परिणामी मोठ्या संख्येने मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी अंत झाला.

Raigad News: पनवेल शहरातील प्लास्टिक पिशव्या हद्दपार, दुकानदारांना नोटिसा बजावल्या, कडक कारवाई सुरू

फार्म मालकाच्या म्हणण्यानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या बिघाडामुळे ठिणग्या पडून आग भडकली असावी.घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीस धाव घेतली , मात्र तोपर्यंत फॉर्मचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र बकरी पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा सुरू असून नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे.

Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम

Web Title: Karjat news massive fire breaks out at goat farm 400 goats dead and 350 pigeons burnt to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • karjat news

संबंधित बातम्या

Karjat News : राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात; रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रशासनाचं दुर्लक्ष
1

Karjat News : राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात; रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रशासनाचं दुर्लक्ष

Karjat News : कर्जतमध्ये बिबट्याचा वावर ; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2

Karjat News : कर्जतमध्ये बिबट्याचा वावर ; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.