
कुंभे आणि जाते गावच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची कुजबुज गेली आठ दिवसांपासून सुरु आहे.मात्र त्या भागातील ग्रामस्थ अंकुश शेळके यांच्याकडे असलेल्या कामगाराला आपल्या बागेच्या परिसरात बिबट्याच्या पायाच्या ठसे आढळून आलाच निरोप दिला. त्यानंतर अंकुश शेळकेग यांनी वन विभागाला दूरध्वनीद्वारे दिली की, जिते-कुंभे परिसरातील स्मशानभूमी आणि नदीकाठच्या भागात बिबट्याचा वावर दिसून आला आहे.
या माहितीची गांभीर्याने दखल घेत प्रभारी वनक्षेत्रपाल सुरेश भुजबळ यांनी आपले पथक तात्काळ कुंभे येथे पाठवून दिले. नेरळचे वनपाल चव्हण यांनी वन रक्षक आणि वन मजूर यांच्या मदतीने वन विभागाच्या पथकाने परिसरात सविस्तर पाहणी केली. यावेळी बिबट्याच्या खुणा आणि ठशांवरून त्याचा वावर या परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी जाते गावच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर बिबट्याच्या पायांचे ठसे मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ते ठसे बिबट्याचे असल्याचे संकेत दिले आहेत.
वनपाल चव्हाण यांनी तातडीने स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकटे घराबाहेर पडू नका, नदीकाठी किंवा जंगलाजवळ जाताना विशेष काळजी घ्या,पाळीव प्राण्यांची सुरक्षा सुनिश्चित करा तसेच परिसरात काही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधा. सध्या वन विभाग या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
फार्महाऊसवर काम करणाऱ्या आकाश मिरकुटे यांनी सकाळी फार्महाऊसच्या गेटवर काही ठसे पाहिले आणि त्याचे फोटो मालकाला पाठवले.त्यानंतर कर्जत वनविभागाचे चव्हाण साहेब आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीकाठचा परिसर आणि मुख्य रस्त्यांची पाहणी केली, जिथे त्यांना बिबट्याच्या पावलांचे स्पष्ट ठसे आढळले.हा परिसर माथेरानच्या जंगलालगत असून समोरच उल्हास नदीचे पात्र आहे. रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी बिबट्या या परिसरात आला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
बिबट्या हा वन्यप्राणी असून जंगलात त्याचे अस्तित्व आहे, परंतु लागून मनुष्यवस्ती असल्यास काही काळजी माणसांनी घेणे आवश्यक आहे. बिबट्या हा आकाराने लहान सावज कडे विशेष हल्ला करतो. त्यामुळे कुत्रे,डुकरं,पिसोरी,प्रसंगी कोंबड्या व खाली बसलेले व्यक्ती,लहान मुले यांना धोका असतो. त्यामुळे घराजवळ कचरा घाण असल्यास त्याकडे भटके कुत्रे आकर्षित होतात व त्यामुळे बिबट्याचा वावर तिकडे होउ शकतो.
रात्री अपरात्री एकट्याने बाहेर पडू नये,उघड्यावर शौचास जाऊ नये,अत्यंत आवश्यक असल्यास रात्री बाहेत पडताना सोबत घोळक्याने बाहेर पडावे. त्यावेळी बाहेर पडत असताना मोबाईलवर,स्पीकर वर मोठ्याने आवाजात गाणे लावावे तसेच मोठा आवाज येईल यानुसार गप्पा,ओरडणे असल्यास बिबट्या परावृत्त होतो. एकटे बाहेर पडत असताना नेहमी हातात काठी,मोबाईलवर जोरात गाणे लावून बाहेर पडावे. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये. बिबट्या दिसून आल्यास वन कर्मचारी, पोलीस विभाग,नगरपालिका प्रशासनला कळवावे आणि लहान मुलांची विशेषतः काळजी घ्यावी, त्यांना रात्री अपरात्री किंवा आड मार्ग परिसरात एकट्याला पाठवू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.