
शहापूर मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनाला मुरबाड करून जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या अवजड वाहनाला अपघात झाला. कर्जत तालुक्यातील कशेळे येथील भवानी माता मंदिर समोर असलेल्या खरड्यांमध्ये आपटून गाडीमधील पाटे तुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे ड्रायव्हर यांनी ही माहिती दिली.
त्यांचेएलपी गाडी क्रमांक.MH 10 Z 0222 ही गाडी मुरबाड वरून अकोला येथील स्टील कंपनी मधून स्पेअर पाईप घेऊन कोल्हापूर कडे जात असताना समोरून येणाऱ्या गाडीच्या लाईट चा प्रकाश आणि रस्त्यावर असलेले खड्डे यामुळे हा अपघात झाला.रस्त्यातील मोठमोठे खड्डे असल्याने खड्ड्यामध्ये गाडी आदलून गाडीचे पाटी तुटल्यामुळे गाडी पलटी झाल्याची घटना घडली असल्याचे दिसून आले.कशेळे परिसरातील अनेक ठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत आणि त्यामुळे वाहनांचे नुकसान तसेच जीवितहानी होत आहे. एम एम आर डी सीला या खड्ड्यांबाबत सातत्याने निवेदने दिली जात आहेत. तरीही एम एम आर डी सी ने याकडे दुर्लक्ष केल्याने अशा अनेक घटना घडत आहे.ग्रामस्थांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे आणि येणाऱ्या काळात उपोषण व आंदोलनाचा तीव्र इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे कशेळे येतील भवानी मंदिरासमोर घडलेली घटना सकाळी चारच्या सुमारात घडली. सुगवे येथील नदीच्या पुलावरील पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एल पी गाडी खर्डे वाचवण्यासाठी ब्रेक मारला असता त्याच रस्त्याने मागाहून येणाऱ्या एल पी 14 चाकी गाडीचा ब्रेक न लागल्यामुळे समोरील गाडीला ठोकून गाडी नदीच्या कठड्यावरून खाली कोसळण्याची घटना घडली आहे. MH 40 CM 6088 ही गाडी चंद्रपूर वरून खोपोलीकडे दगडी कोळसा वाहतूक करणारी गाडी नदीलगतच्या कठड्यावरून खाली कोसल्याची घटना घडली आहे.
एलपी गाडी चालकाला स्टेरिंगचा धक्का लागल्याने छातीला जबर मार लागला असल्याने तात्काळ कर्जत येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. हा अपघात घडला त्यावेळी कशेळे पोलीस ठाण्याचे पोलीस दूर क्षेत्र हवालदार लालासाहेब तोरवे हे पहाटे घटनास्थळी उपस्थिती होऊन यांनी घटनेची पाहणी केली. रस्त्यामध्ये पाईप कोसळले. या वाहनाला अपघात झाल्याने रस्ता बंद झाला होता तो रस्ता पाईप बाजूला करून खुळा करण्यात आला. पोलीस कर्मचारी यांनी तेथील स्थानिक क्रेन बोलावून घेत अपघात ग्रस्त गाडी मधील पाईप उचलण्यास मदत केली.घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदत करणारे पोलीस कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.
कशेळे येतील अपघात नंतर येथे उपस्थित ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून एम एम आर डी सी च्या भोंगल कारभारावर प्रश्नही उपस्थित केला आहे.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कर्जत तालुकाप्रमुख बाजीराव दळवी यांनी प्रशासन जीव गेल्यावर रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे काय? असा प्रश्न केला आहे.सखाराम धुळे, जयेंद्र बोराडे ,सचिन राणे, मंगेश म्हसे ,अभय भोईर,यांनी ट्रॅक चालकाला मदत केली.