Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : निवडणूक नक्की कोणासाठी? निवडणूक यंत्रणेने राखून ठेवल्या ई-रिक्षा, स्थानिक रहिवाशी आणि विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय

माथेरान पालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने 20 पैकी तब्बल 7 ई-रिक्षा आपल्या कामासाठी ठेवून घेतल्या आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 28, 2025 | 03:16 PM
Karjat News : निवडणूक नक्की कोणासाठी? निवडणूक यंत्रणेने राखून ठेवल्या ई-रिक्षा, स्थानिक रहिवाशी आणि विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक नक्की कोणासाठी ?
  • निवडणूक यंत्रणेने राखून ठेवल्या ई-रिक्षा,
  • स्थानिक रहिवाशी आणि विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय
माथेरान शहरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  पर्यावरण पूरक ई रिक्षांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. प्रचारात देखील ई रिक्षा आल्या असून नेत्यांच्या सरबराईसाठी नियम डावलून रिक्षामध्ये प्रवासी घुसवण्यात आले. त्याचेवेळी माथेरान पालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने 20 पैकी तब्बल 7 ई-रिक्षा आपल्या कामासाठी ठेवून घेतल्या आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

माथेरान शहरात नगरपरिषद निवडणूक सुरु असून या निवडणूकीच्या कामासाठी शहरात विद्यार्थ्यी तसेच पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यासाठी असलेल्या ई रिक्षा यांची संख्या कमी करुन 7 ई रिक्षा राखीव ठेवल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे .माथेरानमध्ये सध्या नगरपरिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 20 पैकी सात ई-रिक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आणि स्थानिकांना मोठी गैरसोय होत आहे. शहरात असलेल्या 20 ई-रिक्षा पैकी तीन ई रिक्षा या दुरुस्तीसाठी गेल्यामुळे फक्त 9 ई-रिक्षा उपलब्ध आहेत.त्यातही बॅटरीवर चालणाऱ्या या पर्यावरण पूरक ई रिक्षा असल्याने त्या ई रिक्षा यांना चार्जिंग करावी लागते. दुसरीकडे एकदा बॅटरी डिस्चार्ज झाली की रिचार्ज करण्यासाठी 3ते 4 तास देखील लागतात. कारण ई-रिक्षां सुरु होण्यापूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना टॅक्सी स्टँडवरून चालत जाण्यासाठी कधीही कोणतीही अडचण येत नव्हती. फक्त वाहतुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 7ई-रिक्षा घेतल्यामुळे सेवा देण्यात अडचणी येत आहेत.त्यातही या ई रिक्षा माथेरान शहरातील अनेक रस्त्यांवर चालविल्या जात असून दररोज आलटून पालटून या ई रिक्षा सरकारी यंत्रणेच्या सेवेत असल्याने प्रामुख्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन; ‘माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार’

माथेरानच्या निवडणुकीत ई रिक्षा ठरतेय कळीचा मुद्दा

माथेरान नागरपरिषदेची निवडणूक आता अंतिम टप्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व खासदार सुनिल तटकरे यांच्या सभा एकाच दिवशी झाल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे मतदारांना आकर्षित करणारे मुद्दे समोर आल्याने प्रचार रंगत चालला आहे. मात्र ई रिक्षाच्या मुद्द्यावरून प्रचाराला गती येऊ लागली आहे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाषणात सांगितले ई रिक्षा बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकार तात्काळ अंमलबजावणी करणार आहे. तसेच ई रीक्षा देखील स्वतः राज्य सरकार खरेदी करणार आहे. यामध्ये घोडेवाल्यांचा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही याची ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली शिवराष्ट्र पॅनल च्या सभेत खासदार सुनिल तटकरे यांनी देखील ई-रिक्षा मुळे येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी मदत झाली असून स्थानिक व पर्यटकांची पायपीट वाचली आहे. याचा चांगला परिणाम येथील पर्यटन वाढीसाठी होणार आहे. मात्र या बदलाचा परिणाम येथील आश्वाचालकांवर होणार नाही, याउलट त्यांचा व्यवसाय वाढेल ई रिक्षा पॉईंट वर जाणार नाहीत त्यामुळे त्यांनी निश्चित रहावे हे सांगितले.

Karjat News : राम गणेश गडकरी नाट्यगृह उभारणार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली माहिती

माथेरान शहरात अश्वाचालकांची मतदार संख्या मोठी असल्यामुळे त्यांना सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात गोंजारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.त्याचेवेळी पर्यावरण पूरक ई रिक्षा मध्ये केवळ 3 प्रवासी बसू शकतात,परंतु निवडणुकीच्या काळात नेत्यांकडून चार पाच प्रवासी बसवून ई रिक्षा चालविल्या जात असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिले जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: माथेरानमध्ये ई-रिक्षांचा मुद्दा का चर्चेत आहे?

    Ans: नगरपरिषद निवडणुकीच्या काळात निवडणूक कामासाठी 20 पैकी 7 ई-रिक्षा शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे शहरात फक्त 9 ई-रिक्षा उपलब्ध असून नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटक यांना मोठी गैरसोय होत आहे.

  • Que: निवडणूक यंत्रणेने किती ई-रिक्षा ताब्यात घेतल्या?

    Ans: एकूण 20 पैकी 7 ई-रिक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरात घेतल्या आहेत.

  • Que: उर्वरित ई-रिक्षांची परिस्थिती काय आहे?

    Ans: ई-रिक्षा दुरुस्तीत आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात फक्त 9 ई-रिक्षा नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.

Web Title: Karjat news who exactly is the election for the election system has reserved e rickshaws but it is inconvenient for local residents and students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • karjat news
  • matheran news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : राम गणेश गडकरी नाट्यगृह उभारणार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली माहिती
1

Karjat News : राम गणेश गडकरी नाट्यगृह उभारणार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली माहिती

Matheran News: माथेरान मधील वस्तू पेटंट म्हणून विकसित करणार! सुनील तटकरे यांचे आश्वासन
2

Matheran News: माथेरान मधील वस्तू पेटंट म्हणून विकसित करणार! सुनील तटकरे यांचे आश्वासन

माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन; ‘माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार’
3

माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन; ‘माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.