
कर्जत/संतोष पेरणे : कर्जत तालुक्यात रे ल्वे पट्ट्यात असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि या भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी पाळी भूतीवली येथे धरण बांधण्यात आले.2004 मध्ये या धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा झाला असून या धरणाच्या मातीच्या बांधला दगडी बांधकामी अधिक मजबूत व्हावे रस्ताही दगडी पिचिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे.दरम्यान, या दगडी पिचिंग मुळे धरणाच्या जलाशयात पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे.
पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी येथे शेतकऱ्यांची संघर्ष समिती काम करीत होते. या संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी सरपंच जवाहर देशमुख हे आज हयात नाहीत. मात्र तरीही ही संघर्ष कायम राहील. धरणाच्या कालव्यांची कामे वेगाने व्हावीत यासाठी शासनाच्या पाटबंधारे विभागाने कोणतीही हालचाली केल्या नाहीत. कारण कालवे व्हावेत यासाठी सरकारी यंत्रणा काम करताना दिसत नाही. त्यामुळे गेली 21 वर्षे धरणाच्या जलाशयात पाणी साठा असून पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही.त्यात शेती शिवाय तरणोपाय नाही यांची कल्पना सर्व तरुण वर्गाला अली आहे. त्यामुळे शासनाने कालव्यांची कामे पूर्ण करून शेतीसाठी या धरणाचे पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतकरी आक्रमक आहेत.
मात्र आता सरकारी यंत्रणा यांच्याकडून धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मातीचे बांध असलेल्या या धरणाची उंची वाढवून अधिकच पाणी साठा उपलब्ध करून त्यांचा व्यावसायिक वापर करण्यासाठी पाटबंधारे खाते कामाला लागल्याचे दिसून येत आहे.सध्या धरणाच्या सांडव्याचं भिंतीचे तसेच मुख्य बांधाचे दगडी पिचिंगचे काम पाटबंधारे विभागाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे.धरणाच्या मुख्य बांधावर पाण्याच्या भागात नव्याने दगडी पिचिंग करण्यात आले आहे. त्याचा परिणाम धरणाची उंची वाढण्यासमदत होत आहे.दुसरीकडे धरणाच्या सांडव्याचे उंची देखील वाढविण्यात आली आहे.त्यामुळे धरणातील पाणी साठा नव्याने केलेल्या दगडी पिचिंग मुळे वाढू शकणार आहे. त्याचवेळी धरणाची मुख्य विहीर आणि त्या आजूबाजूचं परिसर देखील मजबूत करण्यात आला आहे.
दुसरीकडॆ धरणाच्या चिंचवाडी भागात असलेल्या जमिनीतील माती बाहेर काढून त्या ठिकाणी लहान बंधारा बांधण्याच्या विचारात पाटबंधारे विभाग असल्याचे दिसून येत आहे.त्या भागात माती काढून तेथील लहान बंधारा बांधता आल्यास पाणी साठा वाढण्यासाठी येणारा खर्च अत्यल्प होण्याची शक्यता आहेत.त्यातून धरणाची पाणी साठा क्षमता देखील वाढू शकणार आहे.त्या भागात लहान धरण बांधल्यास पाली भूतीवली धरणाची क्षमता दुप्पट होऊ शकते.मात्र पाणीसाठा वाढवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात पाटबंधारे खात्याने केली आहे.धरणाच्या मुख्य बांधाची उंची वाढवणे,त्या बांधावर दगड लावून धरण मजबूत करण्याची कामे सुरू आहेत.त्याचा परिणाम आगामी काळात धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.