कर्जत /संतोष पेरणे : स्थानिक पातळीवर कोणत्याही शेतकऱ्यांना मोबदला न देता राजकीय वरदहस्त असल्याने लाल मातीचे खोदकाम केले जात आहे. समाज माध्यमांवर तहसीलदार कर्जत यांनी केलेल्या कारवाई नंतर माध्यमांना स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेत आणि माळरान जमिनीवरील लाल माती ही मन्या कारोटेचा मुलगा काढत असून तोच या लाल माती तस्कराचा मुख्य सूत्रधार असल्याचे आता शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून समोर आले आहे.
गेली वर्षे दीड वर्षे लाल माती तस्करी सुरू असून कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी रात्रीच्या अंधारात लाल माती वाहून नेणारे ट्रक पकडल्यानंतर लाल मातीची चोरटी विक्री करणारे यांचे धाबे दणाणले आहेत.लाल माती तस्करी बद्दल समाज माध्यमांवर माहिती प्रसारित होऊ लागल्यावर अनेक आदिवासी शेतकऱ्यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला.त्यावेळी अनेक शेतकरी यांनी आपली फसवणूक कशाप्रकारे केली जात होती याचा पाढा कॅमेरे समोर वाचला आहे. त्यातून नांदगाव,खांडस, पाथरज आणि ओलमन या चार ग्रामपंचायतीचे हद्दी मधील लाल माती उकरून काढण्यासाठी डोंगर फोडण्यासाठी स्थानिक पातळीवर चार लोक तस्करी मध्ये मदत करीत असल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून स्पष्ट झले आहे.त्यात दोन लोक हे लाल माती काढण्यासाठी जेसीबी पुरविणारे असून त्यांची भूमिका ही लाल मातीचे ठिकाण दाखवून दिल्यावर रात्रीच्या वेळी पनवेल नवी मुंबई भागातून येणारे हायवा ट्रक यांच्यामध्ये लाल माती भरून देणे हे काम असते.
लाल माती काढण्यासाठी जागा निश्चित करण्याचे काम कशेले भागातील एक व्यक्त आणि नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील एक अशा दोघांकडून स्थानिक शेतकऱ्यांना तुमच्या जमिनी सपाट करून देतो,माती काढण्याचे पैसे देतो अशी कारणे पुढे करून माती उकरून कडण्याचे नियोजन करतात.मात्र मागील गेली वर्षभर लाल माती काढून जमिनीची वाट लावल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती काही मोबदला मिळाला नाही.त्यामुळे तहसीलदार यांच्या कारवाई नंतर आदिवासी शेतकरी आक्रमक झाले आहेत.त्यांनी माध्यमांच्या कॅमेरे समोर बोलताना लाल माती काढण्यासाठी आम्हाला आश्वासन देणारा आणि लाल माती काढून झाल्यावर आमची फसवणूक करणारा हा मन्या कारोटे यांचा मुलगा असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मन्या कारोटे ही व्यक्ती शिक्षक असल्याचे आदिवासी लोक सांगत असून लाल माती मध्ये गेली वर्षभर शेतकऱ्यांची फसवणूक करणारा तो तरुण शासनाला एक रुपयाचा महसूल भरत नाही.माती उत्खनन करण्यासाठी गौण खनिज उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाला रॉयल्टी भरावी लागते.परंतु मन्या कारोटे यांचा मुलगा हा शासनाचे सर्व आदेश धुडकावून लावत असून लाल माती माफिया म्हणून हा तरुण स्थानिकावर दादागिरी देखील करीत आहे.
आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक तसेचकवडीमोल भावाने लाल माती खरेदीचे आश्वासन, प्रत्यक्षात मात्र रुपया देखील नाही अशी तक्रार माध्यमांना प्राप्त झाल्या असून महसूल विभागाने या तक्रारी यांची गंभीर नोंद घेवून लाल माती तस्करी मधील प्रमुख म्होरक्या असलेल्या मन्या कारोटे यांच्या मुलाची चौकशी शासन स्तरावर व्हावी अशी मागणी गुटेवाडी येथील आदिवासी शेतकऱ्याने केली आहे.