माथेरान, संतोष पेरणे : माथेरान मध्ये गेल्या काही महिन्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे.त्यास प्रामुख्याने पर्यावरण पूरक ई रिक्षा महत्वाची कारणीभूत ठरली आहे. मात्र ज्या अमानवी प्रथा बंद करण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाने हातरिक्षा चालक यांच्यासाठी पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवण्याची परवानगी दिली होती.मात्र आजही 74 हातरिक्षा चालक यांच्याकडून अमानवी प्रथा असून ही प्रथा बंद करण्याची मागणी हातरिक्षाचालक यांच्याकडून केली जात आहे.
माथेरानमध्ये ई रिक्षा चालू झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि गावातील स्थानिक लोकांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी तसेच पर्यटकांसाठी त्यांचा पुरेपूर फायदा होत आहे,परंतू कुठेतरी हात रिक्षा ओढणारा वर्ग ई रिक्षामुळे आजही स्वावलंबी झालेला नाही. गेले 35-40 वर्ष हात रिक्षा ओढून स्वतःच्या रक्ताचं पाणी करून,स्वतःचा पोटाची ताण भूक न बगता गावातील नागरिक आणि पर्यटकांना दिवस रात्र सेवा देऊन पूर्ण आयुष्य हात रिक्षा ओढन्यात घालवले आहे. आज देखील हात रिक्षा ओढून आपल्या कुटुंबाच उदरनिर्वाह करत आहे, परंतु ई रिक्षा चालू झाल्यामुळे हात रिक्षा ओढणारा वर्ग बेरोजगार झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर व त्याचा कुटुंबावर उपासमार झाली आहे.या विषयावर त्याना कोण न्याय देणार आहे की नाही ? आजच्या युगात देखील माणूस माणसाला हात गाडीत बसून ओढत आहे हे कितपत योग आहे.
या वर प्रशासन काय विचार करणार आहे की नाही ? का त्यांना आयुष्यभर हात रिक्षा ओढूनच आपलं आयुष्य संपाव लागणार आहे ? प्रशासनाने हात रिक्षा ओढणाऱ्याची महिन्या पूर्वी दाखल घेतली आहे. मात्र आजपर्यंत त्यावर विचार का केला जात नाही? या गोष्टीची चिंता हात रिक्षा ओढणाऱ्याना लागली आहे.परंतु आमची प्रशासनाला एकाच विनंती आहे की माथेरान मध्ये जी अमानवी प्रथा चालू आहे ? ती लवकरात लवकर बंद करून हात रिक्षा ओढणाऱ्याना पण ई रिक्षा देऊन त्याचं पुनर्वसन करणार आहे कि नाही हातरिक्षाचालक यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.माथेरान मध्ये ९४ परवाना धारक हातरिक्षा चालक आहे परंतु केवळ २० हातरिक्षाचालक यांना ई रिक्षा चालवण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यावेळी अद्याप ७४ हात रिक्षा चालक हे आजही अमानवी प्रथेनुसार हात रिक्षा ओढत आहेत.