Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: नेरळ-खांडा पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह; मनसेकडून चौकशीची मागणी

कर्जत-नेरळ मार्गावरील नेरळ-खांडा येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर मनसेने गंभीर आक्षेप घेतले आहेत. कमी दर्जाच्या साहित्याचा वापर आणि निकृष्ट कामामुळे पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2026 | 03:16 PM
Raigad News: नेरळ-खांडा पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह; मनसेकडून चौकशीची मागणी

Raigad News: नेरळ-खांडा पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह; मनसेकडून चौकशीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पुलाच्या बांधकामात कमी जाडीच्या लोखंडी सळयांचा वापर केल्याचा आरोप
  • पाण्यातच काँक्रीट टाकल्यामुळे दर्जा खालावल्याची शक्यता
  • मनसेकडून कामाची चौकशी व कारवाईची मागणी
कर्जत: कर्जत-नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या नेरळ-खांडा भागात बांधण्यात येणाऱ्या पुलाबाबत मनसेने अनेक तक्रारी केल्या आहेत. या पुलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळया या कमी जाडीच्या आहेत. तसेच सिमेंट काँक्रिट टाकताना तेथील पाणी काढण्यात आले नव्हते, असा आरोप मनसे नेरळ शहर अध्यक्ष सुभाष नाईक यांनी केला आहे. दरम्यान पुलाच्या कामाची पाहणी करून चौकशी करण्याची मागणी मनसेतर्फे कोकण विभागीय अधीक्षक अभियंत्यांना पत्र देऊन करणार आहे.

ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

जून २०२५ मध्ये कल्याण-कर्जत रस्त्यावरील नेरळ गावातील खांडा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. ४० वर्षे जुना असलेल्या या लहान पुलाचे पिलर खचल्याने पोलिसांनी हा पूल वाहतुकीस बंद केला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल आठ महिने लावले आहे. मार्च २०२६ मध्ये या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले असून बांधकाम विभागाच्या माध्यमातून दोन कोटी खर्चुन हा पूल बांधण्यात येत आहे. पूर्वीच्या लहान पुलाच्या लोखंडी सळ्या या मोठ्या जाडीच्या होत्या, असा दावा मनसेचे नेरळ शहर अध्यक्षांनी केला आहे. तर दुसरीकडे सध्या या पुलाचे पिलर बांधण्याचे काम सुरू असून खाली पाणी असताना काँक्रीटीकरण कसे चांगल्या दर्जाचे होणार? असा प्रश्न देखील केला आहे. मनसेकडून या पुलाच्या कामाबद्दल कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून त्याबाबतचे पत्र पक्षाचे वतीने कोकण भवन येथील अधीक्षक अभियंत्यांना दिले जाणार आहे.

शासनाच्या तिजोरीतून दोन कोटींचा निधी

हा रस्ता सार्वजनिक बांधकामा खात्याने दहा वर्षासाठी पी. पी. खारपाटील कंपनीला दिला आहे. त्यामुळे तो पूल देखील पी.पी. खारपाटील कंपनीने बनविणे आवश्यक होते. परंतु या पुलासाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल दोन कोटीचा निधी दिला जाणार आहे. यास नेरळ बचाव समितीचे कार्यकर्ते मानवाधिर कार्यकर्ते गोरख शेप यानी आक्षेप घेतला आहे. शासनाने जर रस्ता दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीला दिला आहे, तर त्या रस्त्यावरील पूल शासन का बांधते? या प्रश्नाचे उत्तर बांधकाम खात्याने दिले पाहिजे, असे गोरख शेप यांचे म्हणणे आहे.

कामाच्या दर्जाचे काय?

दोन कोटी रुपये खर्चुन पूल बांधला जात असून या पुलाच्या पाया बनविला जात असताना तेथे पाणी असताना कॉक्रिट टाकण्यात आले आहे, तर लोखंडी सळया या देखील कमी जाडीच्या लावल्या जात आहेत. त्यामुळे पुलाचे भवितव्य अधांतरी असू शकते, असा मनसेचा तक्रारी मधील सूर आहे.

Mumbai Local Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक; प्रवासापूर्वी वाचा लोकलचे वेळापत्रक

नेरळ खांडा येथे बांधण्यात येत असलेल्या या पुलाच्या कामासाठी सध्या वापरले जात असलेले लोखंडी ही कमी जाडीचे आहेत. पूर्वीच्या लहान पुलाच्या लोखंडी सळ्या या मोठ्खा जाडीच्या होत्या. पिलरच्या खाली कॉक्रीटीकरण करताना तेथे पाणी होते. त्यामुळे अशा पद्धतीने काँक्रीटीकरण कसे चांगल्या दर्जाचे होणार ?- सुभाष नाईक, नेरळ शहर अध्यक्ष, मनसे

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mns raises concerns over poor quality in neral khanda bridge construction raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Karjat
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने  उपस्थित केला प्रश्न
1

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने उपस्थित केला प्रश्न

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा
2

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा
3

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा

EPFO Scheme : फक्त 6 महिन्यांसाठी असेल लागू, EPFO ची नवी एमनेस्टी स्कीम! पाहा कोणाला आणि कसा होणार फायदा?
4

EPFO Scheme : फक्त 6 महिन्यांसाठी असेल लागू, EPFO ची नवी एमनेस्टी स्कीम! पाहा कोणाला आणि कसा होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.